लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याबाबत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेत आखातातील तणाव कमी करून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या भूमिकेला भारताचा पाठिंबा असल्याचे मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितले.
होर्मुझचा मार्ग जगासाठी सुरक्षित व सुरळीत राहावा आणि तेथे शांतता व स्थैर्य प्रस्थापित व्हावे यासाठी भारत-अमेरिकेमध्ये संपर्क असावा यावर दोन्ही देशांची सहमती झाली.
पाकिस्तानची मध्यस्थीची तयारी
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. हा वाद अर्थपूर्ण व निर्णायक चर्चेतून सुटण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थीला तयार असल्याचे शरीफ यांनी म्हटले.
नवे सुरक्षा अध्यक्ष नियुक्त
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष अली लारिजानी यांच्या जागी मोहम्मद बाघेर झोलघदर यांनी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. झोलघदर हे रिव्होल्युशनरी गार्डमध्ये ब्रिगेडियर जनरल पदावर होते.
Web Summary : Modi and Trump discussed keeping the Hormuz Strait open and peaceful. India supports de-escalation in the Gulf. Both nations agreed on US-India cooperation for regional stability. Pakistan offered to mediate US-Iran conflict. Iran appointed a new national security council chief.
Web Summary : मोदी और ट्रम्प ने होर्मुज जलडमरूमध्य को खुला और शांतिपूर्ण रखने पर चर्चा की। भारत खाड़ी में तनाव कम करने का समर्थन करता है। क्षेत्रीय स्थिरता के लिए दोनों देशों ने भारत-अमेरिका सहयोग पर सहमति जताई। पाकिस्तान ने अमेरिका-ईरान संघर्ष में मध्यस्थता की पेशकश की। ईरान ने एक नया राष्ट्रीय सुरक्षा परिषद प्रमुख नियुक्त किया।