SCOच्या बैठकीत पाकिस्तानचं नापाक कृत्य, NSA अजीत डोवालांनी केलं 'वॉकआउट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 20:50 IST2020-09-15T20:46:35+5:302020-09-15T20:50:08+5:30
शंघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक मंगळवारी झाली. यावेळी पाकिस्तानने पुन्हा एकदा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला.

SCOच्या बैठकीत पाकिस्तानचं नापाक कृत्य, NSA अजीत डोवालांनी केलं 'वॉकआउट'
नवी दिल्ली -पाकिस्तान सातत्याने जगाला भ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळीही त्याने असेच नापाक कृत्य केले आहे. शंघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक मंगळवारी झाली. यावेळी पाकिस्तानने पुन्हा एकदा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. बैठकीत पाकिस्तानने खोटा नकाशा सादर केला. यानंतर एनएसए अजीत डोवाल यांनी बैठकीतून वॉकआउट केले.
यासंदर्भात परराष्ट्रमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी जाणून-बुजून एक चुकीचा नकाशा सादर केला. पाकिस्तान सातत्याने या नकाशाचा प्रचार आणि प्रसार करत आहे. पाकिस्तानच्या या कृत्यानंतर भारताने विरोध दर्शवत बैठकीतून वॉकआउट केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रशिया या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी होता.
पाकिस्तानने गेल्या महिन्यातच जारी केला होता खोटा नकाशा -
अनुराग श्रीवास्तव म्हणाले, पाकिस्तानचे हे कृत्य म्हणजे यजमान रूसच्या अॅडव्हायजरीची घोर उपेक्षा होती. एवढेच नाही, तर पाकिस्तानचे हे कृत्य म्हणजे, बैठकीच्या निकषांचेही उल्लंघन होते. रशियासोबत चर्चा केल्यानंतर, भारताने त्याच क्षणी बैठकीतून वॉकआउट करत पाकिस्तानच्या या कृत्याला विरोध दर्शवला. पाकिस्तानमधील इम्रान सरकारने गेल्यामहिन्यातच एक नवा नकाशा जारी करत, लडाख, सियाचीन आणि गुजरातमधील जुनागड हा पाकिस्तानचा भाग असल्याचे म्हटले होते. तेव्हापासूनच पाकिस्तान या नकाशाचा प्रचार आणि प्रसार करत आहे.
SCO मध्ये या देशांचा समावेश -
शंघाय सहकार्य संघटनेचा (एससीओ) उद्देश संबंधीत भागांत शांतता, सुरक्षितता आणि स्थिरता ठेवणे आहे. यात, चीन, रशिया, भारत, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तझाकिस्तान आणि उझ्बेकिस्तान, या देशांचा समावेश होतो. तर अफगाणिस्तान, बेलारूस, इरान आणि मंगोलिया हे एससीओतील पर्यवेक्षक देश आहेत.
महत्त्वाच्या बातम्या -
PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
खासदारांच्या पगारात होणार 30 टक्के कपात, लोकसभेत विधेयक मंजूर
भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण; ठाकरे सरकारनं दिले चौकशीचे आदेश
मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री