शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत हिंदू राष्ट्रच, मी ािस्ती हिंदू’

By admin | Updated: July 26, 2014 01:44 IST

गोव्यातील मनोहर र्पीकर सरकारमधील मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांचे प्रकार सुरूच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हिंदू राष्ट्र होईल,

पणजी : गोव्यातील मनोहर र्पीकर सरकारमधील मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांचे प्रकार सुरूच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हिंदू राष्ट्र होईल, या मंत्री दीपक ढवळीकर यांच्या वक्तव्याचे अप्रत्यक्षपणो समर्थन करत उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी भारत देश हिंदू राष्ट्र होते व आहे, असे सांगितले. 
भारत म्हणजे हिंदुस्थान असून हिंदुस्थानात राहाणारा प्रत्येक जण हिंदूच असतो. आपण स्वत: ािस्ती हिंदू आहे, असे ते म्हणाले. हिंदू राष्ट्र म्हणून वेगळे काही निर्माण करण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 
दुसरीकडे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्री ढवळीकर यांच्या गुरुवारच्या विधानावर विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. ढवळीकर यांनी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधी पक्ष काँग्रेसने शुक्रवारी विधानसभेत करत सभात्याग केला. केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार आल्याने सरकारचे अभिनंदन करणारा ठराव गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. त्यावर बोलताना मंत्री ढवळीकर यांनी आम्ही सर्वानी जर मोदी यांना पाठिंबा दिला तर भारत हे हिंदू राष्ट्र बनेल व मोदी त्या दृष्टीने काम करतील, अशा अर्थाचे विधान केले. राष्ट्रीय स्तरावरही त्याबाबत प्रतिक्रिया उमटल्या. शुक्रवारी विधानसभा कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणो यांनी त्यावर जोरदार टीका केली. भारत, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीप्रधान देश आहे. घटनेचे रक्षण करण्याची शपथ मंत्र्यांनी घेतलेली असते, हे ढवळीकर विसरेल का, असा सवाल राणो यांनी केला. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, दिगंबर कामत व अपक्ष आमदार विजय सरदेसाईही यांनी ढवळीकरांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.  (खास प्रतिनिधी)
 
च्हिंदू शब्दास व्यापक आणि मोठा अर्थ आहे. हिंदू राष्ट्र असे म्हणताना दुस:या कोणत्याही धर्मातील व्यक्तींच्या भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नव्हता व नाही, असे दीपक ढवळीकर यांनी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर ‘लोकमत’ला सांगितले. 
 
च्दुगरुणांचा नाश करण्याची इच्छा मोदी यांच्याकडे आहे. आम्ही त्यांना पाठिंबा दिला तर देशातील दहशतवाद व नक्षलवाद नष्ट होईल, असे ते म्हणाले. याच अर्थाने मी हिंदू राष्ट्र म्हटले होते. भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे सर्वाना ठाऊक आहे, असेही त्यांनी सांगितले.