शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
6
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
7
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
8
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
9
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
10
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
11
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

India China FaceOff: लडाखमध्ये तणाव वाढला, चिनी सैन्याने गोळीबार केला, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 7:24 AM

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या बऱ्याच महिन्यांपासून तणाव कायम आहे. तसेच परिस्थिती निवळण्यासाठी दोन्हीकडून सैनिकी आणि कुटनैतिक स्तरावर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे.

ठळक मुद्दे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीन आणि भारताच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याची घटना घटनास्थळावर तणाव असला तरी परिस्थिती नियंत्रणात१९७५ नंतर प्रथमच भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेवर गोळीबार

लेह (लडाख) - गेल्या पाच-सहा महिन्यांपासून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये असलेली तणावाची परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. आहे दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीन आणि भारताच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मात्र घटनास्थळावर तणाव असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे.प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या बऱ्याच महिन्यांपासून तणाव कायम आहे. तसेच परिस्थिती निवळण्यासाठी दोन्हीकडून सैनिकी आणि कुटनैतिक स्तरावर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र यादरम्यान, १९७५ नंतर प्रथमच भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेवर गोळीबार झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्षेत्रामध्ये चीनकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर भारतीय लष्कराकडून त्याला तोडीस तोड आणि चोख प्रत्युत्तर देण्यात आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्हीकडून गोळीबार झाला असून, आथा परिस्थिती नियंत्रणता असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

चिनी संरक्षण मंत्रालय, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते कर्नल झांग शुइली यांनी रात्री उशिरा सांगितले की, भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुरापतखोरी करणारी कारवाई केली. त्यामुळे चिनी सैन्याला प्रत्युत्तरदाखल कारवाई करावी लागली, मात्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील या गोळीबाराबाबत भारताकडून कुठलेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

झांग शुईली यांनी भारतीय लष्कराच्या आक्रमक कारवायांबाबत अजून एक खुलासा केला आहे. भारतीय लष्कराने सोमवारी अवैधपणे पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ असलेल्या शेनपाओ पर्वताच्या परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार केली, असा दावा झांग शुईली यांनी केला आहे.

  दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वॉर्निंग शॉट्स फायर झाल्याच्या घटनेला भारतीय लष्कराने दुजोरा दिला आहे. काला टॉप आणि हॅल्मेट टॉपवर कब्जा केल्यापासून सीमेवर तैनात असलेले जवान तेव्हापासून हायअलर्टवर आहेत. तसेच चिनी सैनिक या दोन्ही शिखरांवर कब्जा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे लष्करामधील सूत्रांनी सांगितले.

100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव

दरम्यान,   सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न फसल्य़ाने चीनच्या सैनिकांनी सीमेलगत मोठ्या प्रमाणावर युद्धसराव सुरु केला असून रणगाड्यांसह 100 लष्करी वाहनांमधून जवळपास 1000 सैनिकांनी तळ ठोकला आहे. याचा व्हिडीओच चीनने जारी केला आहेभारतीय सैन्याने गेल्या आठवड्यात चीनच्या घुसखोरीचे प्रयत्न पाहून पेंगाँग तलाव परिसरातील उंचीवरील मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. यामुळे चीनला ही डोंगररांगामधील कसरत भारी पडली असून त्याचा सराव करण्यासाठी ही वाहने आणि सैन्य मोठ्या प्रमाणावर युद्धसरावासाठी तैनात केले आहे. चीनचा सरकारी न्यूज चॅनल सीजीटीएनने याबाबतचा व्हिडीओ जारी केला असून यामध्ये लाईव्ह फायर ड्रील करत असल्याचे म्हटले आहेहे सैनिक 100 गाड्यांमधून इथे पोहोचले आहेत. त्यांनी चीनच्या रेल्वेलाईनद्वारे 2000 किमीचा प्रवास केला आहे. या लाईव्ह फायर ड्रीलमध्ये तोफा, रणगाडे आणि मिसाईल वापरण्यात येणार आहेत. सीजीटीएनचा न्यूज प्रोड्युसर शेन शी वेई याने याचा व्हिडीओ पोस्ट करून ''वाट पहा'' असे म्हणाला आहे  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान