शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

India China Faceoff: ...म्हणून भारत चीनसोबत आरपारच्या लढाईच्या पर्यायासाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:04 AM

लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात मोदी सरकारच्या सर्वोच्च धोरणकर्त्यांमधील चर्चेसाठी 'संघर्ष आणि लढाई' हा शब्द वापरला गेला आहे.

नवी दिल्लीः लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सर्वोच्च धोरणकर्त्यांमध्ये चीनला कशा पद्धतीनं धडा शिकवायचा यावर जवळपास एकमत झालेलं आहे. सीमेवरील वाद सोडविण्यासाठी चीनशी बोलणी सुरू ठेवली पाहिजे, असाही एक मतप्रवाह आहे. पण गरज पडल्यास भारतानं ड्रॅगनशी 'संघर्ष किंवा लढाई'साठी पूर्णपणे तयार असले पाहिजे, असंही काही जणांचं म्हणणं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात मोदी सरकारच्या सर्वोच्च धोरणकर्त्यांमधील चर्चेसाठी 'संघर्ष आणि लढाई' हा शब्द वापरला गेला आहे. या चर्चेत सामील असलेल्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, “आम्हाला संघर्ष वाढवायचा नाही, पण चीनपुढे गुडघे टेकून आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.”आम्ही मागे हटणार नाही आणि आम्ही त्यांना सामोरे जाऊ, लष्करी कारवाईनंतर भारत सरकारने यावर विचार केला आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, "जर आपल्याला या परिणामाची काळजी असेल तर आपण पुढे जाऊ शकणार नाही, असा सरकारचा विचार आहे. 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनच्या प्रतिक्रियेनंतर ड्रॅगनचा सीमेवरचा तणाव कमी करेल, असे वाटतं नाही. चीन जास्तच आक्रमक झाल्यानं आम्हीसुद्धा दुसऱ्या रणनीतीवर विचार करत आहोत. चीनच्या सैन्यानं आमच्या जवानांची हत्या केली. चीननं त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करण्याची अपेक्षा करत नसलो तरी आमच्या सैन्याला ते जबाबदार धरत आहेत. त्यावरूनच बीजिंगचे मनसुबे स्पष्ट होतात. चीनसुद्धा सैन्य मागे घेतो, असं सांगत आहे, पण त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. लडाखच्या सीमेवरील संघर्षाला भारताची चूक आणि सैन्य जमवाजमव जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एप्रिलमध्ये चीनच्या सैन्य जमावाजमवीची पहिली बातमी उघडकीस आली, तेव्हा पेट्रोलिंग व पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नंतर चिनी सैन्यांची संख्या सातत्याने वाढविण्यावरही त्याच प्रमाणात सैन्य केंद्रीकरण वाढवण्याचे निर्देश भारताला देण्यात आले. १९ जून रोजी सर्व पक्षांच्या बैठकीत ही माहिती दिल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात चीनविरूद्ध लोक संतप्त चीनशी असलेले आर्थिक संबंध संपवण्याच्या प्रश्नावर दुसर्‍या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, चीनसोबतचे व्यापार संबंध लगेचच तोडणे शक्य नाही. पण भारताचा विकास हा चीनच्या संबंधांवर अवलंबून राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. चीनविरोधात देशात प्रचंड संताप आहे. देशाचे आर्थिक हितसंबंधही लक्षात ठेवले पाहिजेत. लष्करी व मुत्सद्दी दबाव वाढवण्याशिवाय भारताकडे पर्याय नाही, असंही त्यांनी सांगितलं. दुसर्‍या अधिका-याने सांगितले की, 'आज कोणीही युद्ध जिंकत नाही आणि सन २०२०चा भारत १९६२चा राहिलेला नाही. भारतानं प्रचंड जागतिक आघाडी घेतली आहे आणि आम्हाला त्याचा फायदा घ्यावा लागेल. आपल्या ताकदीद्वारे चीनला संपूर्ण प्रदेशात भीती निर्माण करायची आहे आणि स्वत: ला एक महाशक्ती म्हणून प्रस्थापित करायचे आहे. पण त्यांनाही चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे चीनने समजून घ्यायला हवे. 

हेही वाचा

पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार

आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार

टॅग्स :chinaचीनIndiaभारत