Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनले आहे, जेथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 09:03 AM2020-06-29T09:03:15+5:302020-06-29T09:04:59+5:30

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनले आहे, जेथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे.

petrol diesel price hike again | पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्लीः पेट्रोल-डिझेलच्या किमती आजही पुन्हा वाढल्या आहेत. या महिन्यात सलग 21 दिवस पेट्रोल अन् डिझेलच्या इंधन दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर काल रविवारी त्याच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती. पण आज पुन्हा दोन्ही इंधनाचे दर वाढले आहेत. डिझेल 13 पैशांनी महागले असून, पेट्रोलची किंमतही 5 पैशांनी वाढली आहे. या महिन्यात सलग 21 दिवस इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी दरवाढ केली नव्हती. पण आज सोमवारी पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. कालच्या 80.38 रुपयांच्या तुलनेत दिल्लीत पेट्रोलचे दर 5 पैशांनी वाढून 80.43 रुपये झाले आहेत. डिझेलही 13 पैशांनी वाढून त्याचा भाव 80.53 रुपयांवर पोहोचला आहे. काल दिल्लीत डिझेलची किंमत 80.40 रुपये होती. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनले आहे, जेथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे.

या महिन्यात डिझेलची किंमत 11.23 रुपयांनी वाढली आहे, तर पेट्रोलची किंमत 9.17 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या महिन्याच्या कच्च्या तेलाचे दर घसरले, तरीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत चालल्या आहेत. सध्या भारतीय बास्केट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 42 डॉलर इतकी आहे. तरीसुद्धा या महिन्यात जवळपास पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढतच राहिले आहेत. याचाच परिणाम म्हणजे गेल्या 23 दिवसांत डिझेलच्या दरात प्रतिलिटर 11.23 रुपयांची वाढ झाली आहे. या दिवसांत पेट्रोलच्या दरातही प्रतिलिटर 9.17 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

शहराचं नावपेट्रोल/ रुपये लिटरडिझेल/ रुपये लिटर
दिल्ली 
80.43
80.53
मुंबई
87.19
78.83
चेन्नई
83.63
   77.72
कोलकाता   82.10
75.64
नोएडा   81.08
72.59
रांची 
80.29
   76.51
बंगळुरू  83.04
76.58
पाटणा 
83.31
  77.40
चंदीगड  77.41
71.98
लखनऊ  80.98  72.49


जाणून घ्या, आपल्या शहरातील आजचे दर
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता ते अद्ययावत केले जातात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील माहिती करता येऊ शकतात (दररोज डिझेल आणि पेट्रोलची किंमत कशी तपासायची). इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP लिहून 9224992249 वर मेसेज पाठवल्यानंतर आजच्या दराची माहिती मिळू शकते. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 वर पाठवल्यास माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याच वेळी, एचपीसीएलचे ग्राहक HPPrice लिहून आणि 9222201122 क्रमांकावर मेसेज पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

हेही वाचा

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार

आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार

Web Title: petrol diesel price hike again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.