शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

चीनचा हटवाद : सैन्य माघारी घेण्यास नकार; पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग, गोगरा, देपसांगमधील पेचप्रसंग कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 07:18 IST

india china faceoff : गेल्या आठवड्यात उभय देशांत ११ व्या फेरीची चर्चा १३ तास चालली. त्यात चीनने या क्षेत्रांतून माघारी जाण्यास नकार दिला.

नवी दिल्ली : भारतचीनसोबतचे तणावाचे संबंध निवळण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत असला तरी चीनने पुन्हा एकदा हटवादी भूमिका घेत पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि देपसांगच्या संघर्षमय क्षेत्रांतून सैनिकांना माघारी घेण्यास नकार दिला आहे. गेल्या आठवड्यात उभय देशांत ११ व्या फेरीची चर्चा १३ तास चालली. त्यात चीनने या क्षेत्रांतून माघारी जाण्यास नकार दिला.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पीएलएने गोगरा-हॉट स्प्रिंग्स भागांत एप्रिल २०२० च्या आधीच्या स्थितीत परत जाण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी चीनने भारतीय लष्कराला विचार करण्यासाठी काही प्रस्ताव दिले आहेत. या क्षेत्रांत सैनिकांना पूर्णपणे मागे जाण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.चीनला हे स्पष्टपणे हवे आहे की, भारतीय लष्कराने आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) पेट्रोलिंग पॉइंट १५ आणि १७ ए वर त्याच्या नव्या स्थितीला स्वीकारावे आणि तो या क्षेत्रांत एप्रिल २०२० च्या आधीच्या स्थितीत जायला आढेवेढे घेत आहे.दुसरा एक अधिकारी म्हणाला की, गोगरा-हॉट स्प्रिंग्स क्षेत्रांत चीनचे जवळपास ६० सैनिक एप्रिल २०२० च्या स्थितीपेक्षा पुढे आले आहेत आणि या क्षेत्राला रिकामे करण्याची प्रक्रिया चीन त्याचे सैनिक मागे घेणार नाही, तोपर्यंत पूर्ण झाली, असे मानले जाणार नाही. एकदा हा टप्पा पूर्ण झाला की, त्यानंतर देपसांग क्षेत्रात भारतीय लष्कराच्या गस्ती अधिकारांच्या मुद्यावर पुढे जाता येईल. हा मुद्दा वर्ष २०१३ पासून आहे.

सैनिकांसाठी पुरवतोय रसद...-    हे भाग भारत आणि चीन दोघांसाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. चिनी सैन्य गोगरा, हॉट स्प्रिंग आणि कोंगकाला क्षेत्रातून तैनात आपल्या सैनिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रसद पोहोचवतो आहे. -    लष्करी चर्चेची दहावी फेरी २० फेब्रुवारी रोजी झाली होती. दोन्ही देशांचे सैन्य पैंगोंग झीलच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून आपापले सैनिक आणि शस्रास्रे माघारी घ्यायला तयार झाले होते. आता मात्र चीन आढेवेढे घेत आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनIndiaभारत