तणाव वाढतोय : POKमध्ये पाकिस्तान, तर LACवर चीननं आणलं 20 हजार सैन्य, भारतीय जवानही अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:11 PM2020-07-01T15:11:19+5:302020-07-01T15:24:40+5:30

सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने  उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

india china face off chinese amry deployment increase on LAC indian army alert | तणाव वाढतोय : POKमध्ये पाकिस्तान, तर LACवर चीननं आणलं 20 हजार सैन्य, भारतीय जवानही अलर्ट

तणाव वाढतोय : POKमध्ये पाकिस्तान, तर LACवर चीननं आणलं 20 हजार सैन्य, भारतीय जवानही अलर्ट

googlenewsNext
ठळक मुद्देचीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. एलएसीवरील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय संरक्षण संस्थांची नजर आहे.गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉइंट-15, पेंगाँग त्सो आणि फिंगर एरियामध्ये भारताने तैनाती वाढवली आहे.

लेह - लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) सातत्याने तणाव वाढत आहे. यातच चीनने अपली तैनाती अणखी वाढवली आहे. आता चीनने सैन्याच्या दोन डिव्हिजन सीमेवर तैनात केल्या आहेत. याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्करानेही एलएसीवर आपली तैनाती वाढवली आहे. हा तणाव ऑक्टोबरपर्यंत असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिबेट आणि शिनजियांग प्रांतात असलेले चीनचे 10 हजार अतिरिक्त सैनिक गेल्या काही दिवसांपासून युद्धाभ्यास करत आहेत. एलएसीवरील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय संरक्षण संस्थांची नजर आहे. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी सूत्रांनीही एलएसीवर चीनने अतिरिक्त सैनिक तैनात केल्याची पुष्टी केली आहे.

भारताने ब्रिगेड एवढ्या जवानांना केले तैनात -
गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉइंट-15, पेंगाँग त्सो आणि फिंगर एरियामध्ये भारताने तैनाती वाढवली आहे. चीनचा सामना करण्यासाठी भारताने एक ब्रिगेड एवढे सैन्य तैनात केले आहे. याशिवाय भारताने रणनीतीक पॉइंट्सवरही आपली तैनाती अधिक वाढवली आहे. तसेच टँक आणि शस्त्रास्त्रे सीमेवर पोहोचविली जात आहेत.

चीनने 20 हजार जवान केले तैनात -
सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने  उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी सैन्याचे अतिरिक्त डिव्हिजन 48 तासांत भारतीय पोझिशनवर पोहोचू शकते. 

पाकिस्तानने LOCवर आणले 20 हजार सैनिक -
लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात तणाव सुरू असतानाच पाकिस्ताननेही गिलगित-बाल्टिस्तानमध्ये एलओसीजवळ सैन्याच्या दोन डिव्हिजन तैनात केल्या आहेत. म्हणजेच एलओसीजवळ जवळपास 20 हजार सैनिक तैनात करून पाकिस्तान भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात पाकिस्तान, असे कृत्य चीनच्या इशाऱ्यावर करत असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर -
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे. चीन सीमेवर सातत्याने सैनिक वाढवत आहे. यामुळी चीनची काही चाल तर नाही ना? अशी शंका उत्पन्न होत आहे. कारण, चर्चेदरम्यान चीनने मागे हटन्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तो सीमेवर सातत्याने तैनाती वाढवतच चालला आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या -

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'


 

Web Title: india china face off chinese amry deployment increase on LAC indian army alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.