चीनबरोबरची चर्चा निष्फळच; LACवर लष्कर अलर्ट, चिनी सैनिकांनी असा केला होता भारतीय जवानांवर भ्याड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:42 PM2020-06-17T12:42:45+5:302020-06-17T12:49:26+5:30

ज्या ठिकाणावर ही चकमक झाली त्याच्या खालून श्योक नदी वाहते. अनेक सैनिक या नदीत वाहून गेल्याचेही वृत्त आहे.

india china conflict on galwan valley indian army alert | चीनबरोबरची चर्चा निष्फळच; LACवर लष्कर अलर्ट, चिनी सैनिकांनी असा केला होता भारतीय जवानांवर भ्याड हल्ला

चीनबरोबरची चर्चा निष्फळच; LACवर लष्कर अलर्ट, चिनी सैनिकांनी असा केला होता भारतीय जवानांवर भ्याड हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देदगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला.अनेक सैनिक श्योक नदीत वाहून गेल्याचे वृत्त आहे.भारताने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनबरोबरचा तणाव वाढतच चालला आहे. लष्कराच्या सूत्रांनी म्हटले आहे, की कालपासून सुरू असलेल्या चर्चेचा विशेष परिणाम झालेला नाही. सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे. चर्चा करूनही परिस्थितीत कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. केवळ लडाखच नाही, तर एलएसीवर इतर भागांतही लष्कर अलर्ट मोडवर आले आहे.

याच दरम्यान, भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात येतील. चिनी सेन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले. ही घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली. भारतीयसैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेत्रृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. 

India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद

दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला -
हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्यामुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे भारतीय जवानांना चिनी सैन्याकडून धोका मिळाला. दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी चिनी सैनिकांनी या पथकावर हल्ला केला. यात कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन जवान तेथेच शहीद झाले. तर अनेक जवान जखमी झाले.

जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'

अनेक सैनिक श्योक नदीत वाहून गेल्याचेही वृत्त - 
ज्या ठिकाणावर ही चकमक झाली त्याच्या खालून श्योक नदी वाहते. अनेक सैनिक या नदीत वाहून गेल्याचेही वृत्त आहे. तर अनेक जखमी सैनिकांच्या जखमा याथील शून्यापेक्षाही कमी तापमाणामुळे लवकर न ठीक झाल्याने त्यांना हौतात्म्य आले. भारताने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे म्हटले आहे.

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

या चकमकीत आपले किती नुकसान झाले, हे सांगण्यासाठी आद्याप चीनने तोंड उघडण्याची हिम्मत केलेली नाही. मात्र तिकडेही मोठे नुकसान झाल्याचे वृत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचे एक तर 43 सैनिक मारले गेले आहेत अथवा गंभीररित्या जखमी आहेत. या प्रकरणांनंतर दिल्लीत सातत्याने बैठका होत आहेत.

चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!

कोणाला आले होतात्म्य?
चीनच्या या हल्ल्यात १६ बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू व एम. पलानी आणि कुंदन ओझा या जवानांना हौतात्म्य आले. कर्नल बाबू मूळचे तमिळनाडूचे तर पलानी व ओझा हे अनुक्रमे तमिळनाडू व झारखंडचे आहेत. त्यांच्या हौतात्म्याची सूचना कुटुंबियांना लष्कराकडून अधिकृतपणे देण्यात आली. कर्नल बाबू गेले दीड वर्ष चीनच्या सीमेवर तैनात होते व गेल्या डिसेंबरमध्येच त्यांनी ९ रजिमेंट तुकडीचे कमांडिंग आॅफसर म्हणून सूत्रे हाती घेतली होती. ओझा २२ वर्षे लष्करात होते.

CoronaVirus News: कोरोनाचं 'हे' रूप इतर Covid-19च्या रुपापेक्षा 10 पट घातक, देण्यात आलं असं नाव

 

Web Title: india china conflict on galwan valley indian army alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.