कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:57 IST2025-08-11T11:54:53+5:302025-08-11T11:57:09+5:30

India Cheating Rate : आता लोक cheating ऐवजी Choice आणि betrayal ऐवजी boundaries असे शब्द वापरू लागले आहेत

India Cheating Rate Falls 16% In 2 Years As Couples Choose Clarity Over Chaos Says Survey | कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...

कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...

India Cheating Rate : भारतात विवाहबाह्य संबंध किंवा प्रेमात फसवणूक या गोष्टींबाबत हल्ली उघडपणे चर्चा केली जाते. पूर्वीच्या काळात याबाबत बोलणे किंवा चर्चा करणे हा प्रकार फारच कमी होता. गेल्या काही वर्षात भारतातघटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्याशिवाय, प्रेमात फसवणूक किंवा ब्रेक अप यांच्याबाबतच्या प्रकरणातही वाढ झाली आहे. पण याचदरम्यान, ग्लीडेन नावाच्या डेटिंग अ‍ॅपने इप्सोसच्या सहकार्याने एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये असे दिसून आले की भारतात २०२३ पासून प्रेमात फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये १६% घट झाली आहे.

सर्वेक्षणातून असे दिसून आले की, २०२५ मध्ये ४८% लोकांनी त्यांच्या जोडीदाराची फसवणूक केल्याचे कबूल केले, तर २०२० मध्ये हा आकडा ५७% होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा बदल केवळ लोकांच्या वागण्यातच नाही तर त्यांच्या विचारसरणीतही येत आहे. लोक पूर्वीपेक्षा अधिक निष्ठावान झाले आहेत असा याचा सरळ अर्थ नाही, तर आता लोक निष्ठेच्या मुद्द्यावर उघडपणे बोलू लागले आहेत आणि विचार करू लागले आहेत. भारतीय समाजात नातेसंबंध आणि वैयक्तिक जीवनाबाबत वाढत्या खुल्या विचारसरणीचा हा एक भाग मानला जात आहे.

प्रेमात फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये १६% घट

गेल्या दोन वर्षांत, भारतात नोंदवलेल्या प्रेमात फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये १६% घट झाली आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की लोक विवाहबाह्य संबंध ठेवत नाहीत. फरक एवढाच आहे की आता ते या विषयावर प्रामाणिकपणे आणि उघडपणे बोलत आहेत. पूर्वी ज्या गोष्टी गुप्तपणे घडायच्या, त्या आता अनेक वेळा जोडीदाराच्या संमतीने घडत असल्याचा अंदाज लावला जात आहे. आता प्रेमप्रकरणात भाषादेखील बदलत आहे. आता लोक cheating ऐवजी Choice आणि betrayal ऐवजी boundaries असे शब्द वापरू लागले आहेत.

महिला पूर्वीपेक्षा अधिक जागरूक

आता जोडप्यांनी त्यांच्या नात्यांमध्ये उघडपणे बोलणे सुरू केले आहे, त्यामुळे भागीदार एकमेकांना कमी फसवत आहेत. 'ग्लीडेन'चे सुमारे ३५% भारतीय युजर्स या आता महिला आहेत. महिलांसाठी, फक्त भावनिक जोड्या, जास्त बोलणे, फ्लर्ट करणे किंवा दुसऱ्याबद्दल कल्पना करणे हे देखील 'फसवणूक' मानले जाऊ शकते. सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की पुरुष आणि महिला यांच्या फसवणुकीच्या धारणा समान आहेत. दुसऱ्याशी शारीरिक आणि भावनिक संबंध ठेवणे म्हणजे फसवणूक आहे असे दोघेही मानतात. परंतु महिलांची धारणा अधिक कठोर असल्याचे दिसते. आता महिला पूर्वीपेक्षा जास्त जागरूक झाल्या आहेत, म्हणून त्यांना असे नाते हवे आहे जे भावनांवर आधारित असेल आणि ज्यामध्ये काहीही लपवण्याची किंवा दोषी वाटण्याची गरज नसेल. त्यामुळेच सर्वकाही स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे असे त्यांचे मत दिसते.

Web Title: India Cheating Rate Falls 16% In 2 Years As Couples Choose Clarity Over Chaos Says Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.