Incumbent Congress MLA B Narayan Rao dies due to corona | काँग्रेसचे विद्यमान आमदार बी नारायण राव यांचं कोरोनामुळे निधन

काँग्रेसचे विद्यमान आमदार बी नारायण राव यांचं कोरोनामुळे निधन

ठळक मुद्देनारायण रावे हे कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते.

बंगळुरू - कोरोनामुळे कर्नाटकातील काँग्रेसचे विद्यमान आमदार बी नारायण राव यांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी 3.55 वाजता नारायण राव यांनी अखेरचा श्वास घेतला. 1 सप्टेंबर रोजी त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हापासून त्यांच्यावर कोविड 19 चे उपचार सुरू होते. रुग्णालयात असतानाच आज त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यांच्या शरीरातील काही भाग निर्जीव झाले होते, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. मनिष राय यांनी सांगितले . 

नारायण रावे हे कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. नारायण राव यांच्या निधनाने राज्यातील काँग्रेसमध्ये शोककळा पसरली असून कोरोनाला गंभीरतेने घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात येत आहे. 

 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Incumbent Congress MLA B Narayan Rao dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.