देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ

By Admin | Updated: June 13, 2014 03:29 IST2014-06-13T03:29:16+5:302014-06-13T03:29:16+5:30

स्त्रियांप्रती आदरभाव वाढावा व बलात्काराच्या घटना रोखल्या जाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असले तरी, राजधानी दिल्लीसह देशभरात काल बलात्काराच्या अनेक घटनांची नोंद करण्यात आली.

Increase in rape cases across the country | देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ

देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ

नवी दिल्ली : स्त्रियांप्रती आदरभाव वाढावा व बलात्काराच्या घटना रोखल्या जाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असले तरी, राजधानी दिल्लीसह देशभरात काल बलात्काराच्या अनेक घटनांची नोंद करण्यात आली.
दक्षिण दिल्लीत २५ वर्षांच्या एका तरुणीवर चालत्या गाडीत तिघांनी बलात्कार केला असून त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर बलात्काराच्या दुसऱ्या घटनेत उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधील २४ वर्षांच्या एका तरुणीने पोलीस उपनिरीक्षकावरच बलात्काराचा आरोप केला आहे.
आपल्या नवऱ्याच्या सुटकेसाठी गेलेल्या या तरुणीवर तेथील पोलिसांनीच बलात्कार केल्याचे तिचे म्हणणे आहे; मात्र डीआयजी अमिताभ यश यांच्या सांगण्यानुसार, या महिलेच्या वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याची नोंद नाही, तसेच ती साडेतीन महिन्यांची गरोदर असल्याचे म्हटले आहे.
मुरादाबाद येथे १९ वर्षांच्या एका मुलीचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून पोलिसांच्या मते, हा आत्महत्येचा प्रकार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Increase in rape cases across the country