शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडले नागपूर हेरिटेज गॅलरीचे उद्घाटन

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

हायकोर्टात अहवाल : ३ लाख २३ हजाराची गरज

हायकोर्टात अहवाल : ३ लाख २३ हजाराची गरज

नागपूर : अजब बंगला नावाने प्रसिद्ध मध्यवर्ती संग्रहालयातील नवनिर्मित नागपूर हेरिटेज गॅलरीचे उद्घाटन विद्युतीकरणासाठी निधी मिळाला नसल्यामुळे रखडले आहे. विद्युतीकरणासाठी ३ लाख २३ हजार १७२ रुपयांची गरज आहे.
संबंधित प्रकरणातील न्यायालयीन मित्र ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मध्यवर्ती संग्रहालयाच्या सध्यास्थितीचा अहवाल सादर करून या बाबीकडे लक्ष वेधले. संग्रहालयाच्या अभिरक्षकांनी सर्वप्रथम ३० जून २०१४ रोजी शासनाला पत्र लिहून निधीची मागणी केली होती. यानंतर त्यांनी १६ ऑक्टोबर व १५ नोव्हेंबर रोजी स्मरणपत्रे पाठविली. परंतु, हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. शासनाने यावर काहीच उत्तर दिलेले नाही. याशिवाय, संग्रहालयाच्या सहायक अभिरक्षकाचे पद १ ऑक्टोबर २०११ पासून रिक्त आहे. चौकीदारांच्या दोन, तर टेक्निकल असिस्टन्ट (लेबॉरेटरी)च्या एका पदावर अद्याप नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अजब बंगल्यातील विविध समस्यांची दखल घेऊन उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर २३ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
--------------
चौकट.....
पोलीस आयुक्त प्रतिवादी
संग्रहालयात सोने-चांदीचे अनेक मौल्यवान दागिने व पुरातन वस्तू आहेत. अशा परिस्थितीत चौकीदार किंवा सुरक्षा रक्षकांकडे शस्त्रे असणे आवश्यक आहे. स्थानिक पोलिसांनी सुरक्षा पुरविल्यास ही समस्या सुटू शकते. त्यासाठी याचिकेत पोलीस आयुक्तांना प्रतिवादी करण्याची मान्यता न्यायालयाने दिली आहे. पोलीस आयुक्तांना यासंदर्भात नोटीस बजाण्यात आली आहे.