सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:01+5:302014-12-19T22:57:01+5:30

नवी दिल्ली-काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सर गंगाराम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. ६८ वर्षांच्या सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांधी रुग्णालयाच्या श्वसन चिकित्सा विभागाचे वरिष्ठ चिकित्सक डॉ. अरुपकुमार बसू हे त्यांच्या प्रकृतीची देखभाल करीत आहेत.

Improvement in Sonia Gandhi's health | सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा

सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा

ी दिल्ली-काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सर गंगाराम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. ६८ वर्षांच्या सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांधी रुग्णालयाच्या श्वसन चिकित्सा विभागाचे वरिष्ठ चिकित्सक डॉ. अरुपकुमार बसू हे त्यांच्या प्रकृतीची देखभाल करीत आहेत.

Web Title: Improvement in Sonia Gandhi's health