सुधारित..कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार.... एक ठार

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:42+5:302015-02-14T23:51:42+5:30

कॅफेवर गोळीबार (डेन्मार्क)

Improved .. firing on Copenhagen cafeteria .... One killed | सुधारित..कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार.... एक ठार

सुधारित..कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार.... एक ठार

फेवर गोळीबार (डेन्मार्क)

कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार, १४ फेब्रुवारी २०१५

कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार; एक ठार; तीन जखमी
कोपेनहेगन : उत्तर कोपेनहेगनमधील एक सांस्कृतिक केंद्रावर हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. जाझसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रूड˜ोएनडेन कॅफेत स्वीडीश कलाकार लार्स व्हिलक्सने परिसंवादाचे आयोजन केले होते. या हल्ल्यात एक जण ठार, तर तीन पोलिस अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर कारमधून पसार झाले. फ्रान्सने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
टीव्ही-२ चॅनलच्या वृत्तानुसार हल्लेखोरांनी बाहेरुन गोळ्या झाडल्या. दोन व्यक्तींना स्ट्रेचरवरून नेण्यात आले. यात एका पोलीस अधिकार्‍याचा समावेश आहे. कला, ईशनिंदा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा या परिसंवादाचा विषय होता. ७ जानेवारी रोजी पॅरिस येथील चालॉ हेब्डोवर करण्यात आलेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा हल्लेखोरांचा इरादा होता. हल्लेखोरांनी २०० फैरी झाडल्याचे पोलिस सांगतात.
डेन्मार्कमधील फ्रेंच राजदूत फ्रॅन्कोईस झिमेरी हेही यावेळी या ठिकाणी उपस्थित होते. हेली मेरेट ब्रिक्स यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, कलाकार लार्स व्हिलक्स हेही यावेळी उपस्थित होते. सुदैवाने ते जखमी झाले नाहीत. एका बुरखाधारी व्यक्तीला पळत जाताना मी पाहिले. लार्स व्हिलक्स हेच हल्लखोरांचे लक्ष्य होते, असेही त्यांनी सांगितले. स्वीडीश कलाकार लार्स व्हिलक्स यांना अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असून, त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाले. पेनेस्लिव्हियाच्या एका महिलेने लार्स व्हिलक्स यांना ठार मारण्याचा कट केला होता. तिला गेल्या वर्षी १० वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला.२००७ पासून व्हिलक्स यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

Web Title: Improved .. firing on Copenhagen cafeteria .... One killed