शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नोटा बाळगाल, तर तुरुंगाची हवा खाल

By admin | Updated: December 29, 2016 04:03 IST

३१ मार्चनंतर ५०० व एक हजार रुपयांच्या दहापेक्षा अधिक नोटा जवळ बाळगाल, तर तुम्हाला पन्नास हजार रुपयांचा दंड आणि चार वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.

नवी दिल्ली : ३१ मार्चनंतर ५०० व एक हजार रुपयांच्या दहापेक्षा अधिक नोटा जवळ बाळगाल, तर तुम्हाला पन्नास हजार रुपयांचा दंड आणि चार वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. चलनातून काढून घेण्यात आलेल्या ५००, तसेच १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे, कायदेशीर विमुद्रीकरण (डिमॉनेटायझेशन) करणाऱ्या वटहुकमाच्या मसुद्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे चलनातून बाद केलेल्या नोटांचे मूल्य धारकास अदा करण्याची सरकार व रिझर्व्ह बँकेची जबाबदारी ३१ मार्चनंतर संपुष्टात येईल आणि विमुद्रीकरण केलेल्या नोटा जवळ बाळगणे हा गुन्हा ठरेल.केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेला हा वटहुकूम मसुदा सहीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविला जाईल. सरकारने ८ नोव्हेंबरचा नोटाबंदीचा निर्णय आणि त्यानंतरचे उपाय प्रशासकीय आदेशांद्वारे केले होते. त्याला कायदेशीर वैधता मिळेल. संसदेच्या येत्या अधिवेशनात या वटहुकमाचे कायद्यात रूपांतर करून घ्यावे लागेल. चलनातील प्रत्येक नोट हे सरकारचे जनतेप्रती ऋण असते. म्हणूनच प्रत्येक चलनी नोटेवर त्या नोटेच्या मूल्याएवढी रक्कम धारकास अदा करण्याचे अभिवचन रिझर्व बँकेच्या गव्हर्नरच्या स्वाक्षरीने छापलेले असते. देशात सर्व प्रकारचे चलन जारी करण्याचा अधिकार कायद्याने फक्त रिझर्व बँकेस दिलेला आहे. मात्र, कोणत्याही नोटा, काही विशिष्ट परिस्थितीत, रिझर्व बँकेच्या सल्ल्याने, सरकार चलनातून काढून घेऊ शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)नोटाबंदीमागच्या कायदेशीर बाबी - आताचा वटहुकूम का काढला जात आहे, हे समजण्यासाठी एखादी नोट चलनातून काढून घेणे आणि त्या नोटेचे कायदेशीर विमुद्रीकरण करणे यातील फरक समजावून घेणे गरजेचे आहे. - नोट चलनातून काढून घेतली, तरी तिचे मूल्य व तेवढी रक्कम धारकास अदा करण्याची सरकार/ रिझर्व बँकेची जबाबदारी नष्ट होत नाही. याउलट विमुद्रीकरणाने संबंधित नोटेचे मूल्य कायदेशीरपणे निर्लेखित होते. परिणामी, तेवढे मूल्य धारकास अदा करण्याचे सरकारवर बंधन राहात नाही.- नोटांचे विमुद्रीकरण न करता, त्या फक्त चलनातून काढून घेण्याची कारवाई सरकार प्रशासकीय अधिसूचना काढून करू शकते. मात्र, असे केले की, चलनातून काढून घेतलेल्या नोटांचे मूल्य धारकास वैध नोटांच्या स्वरूपात देण्याची जबाबदारी सरकारवर येते. - म्हणजेच बाद नोटा बदलून द्याव्या लागतीत. याचे कारण नागरिकांकडील चलनी नोटा ही त्यांची मालमत्ता असून, संसदेने केलेल्या कायद्याखेरीज सरकार नागरिकांना त्यांच्या संपत्तीपासून वंचित करू शकत नाही. म्हणूनच विमुद्रीकरण कायद्याने (इथे वटहुकूमही) केले जाऊ शकते. - चलनातून बाद केलेल्या नोटा सरकार बदलून देत असल्याने वा तेवढी रक्कम धारकाच्या बँक खात्यांमध्ये जमा करीत असल्याने नागरिक संपत्तीपासून वंचित होत नाही. त्यामुळे त्यासाठी कायदा करण्याची गरज नसते.- ही कायदेशीर पूर्तता करण्यासाठीच आताचा वटहुकूम ‘स्पेसिफाइड बँक नोट्स (सीझेशन आॅफ लायबेलिटिज) आॅर्डिनन्स’ या नावाने काढण्यात येणार आहे.1978 चा दाखला...याआधी १९७८ मध्ये पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या जनता पक्षाच्या सरकारने पाच हजार व १० हजारांच्या नोटा रद्द केल्या होत्या. त्या वेळी ‘डिमॉनेटायझेशन आॅफ हाय डिनॉमिनेशन करन्सी नोट्स’ असा कायदा करून, त्या नोटांचे कायदेशीर विमुद्रीकरण केले गेले होते. त्या वेळी नोटा बँकांमधून घेण्यासाठी लोकांना १६ ते २४ जुलै अशी फक्त नऊ दिवसांची मुदत दिली गेली होती. त्या वेळी सुरुवातीस वटहुकूम काढून नंतर ३० मार्च रोजी संसदेत रीतसर कायदा केला गेला होता. त्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश शासनाने चलनात आणलेल्या उच्च मूल्याच्या नोटांचे विमुद्रीकरण करण्यासाठी सरकारने १९५६ मध्ये कायदा केला होता.९0 टक्के बंद नोटा बँकांत जमा- नरेंद्र मोदी सरकारने ८ नोव्हेंबर रोजी चलनातून बाद केलेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांपैकी 90% नोटा बँकांत भरल्या गेल्या आहेत. - 15.4 लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यापैकी १४ लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकांत जमा झाल्या आहेत.- नोटाबंदीनंतर 03 लाख कोटींच्या नोटा बँकांत जमा होणार नाहीत, असा सरकारचा अंदाज होता. तथापि, तो साफ कोलमडला आहे.