शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान दिला जात नसेल तर शपथविधीला का जायचे - शिवसेना

By admin | Updated: October 30, 2014 17:25 IST

शिवसेनेला योग्य सन्मान दिला जाणार नसेल तर कशाला जायचे त्या शपथविधी सोहळ्याला अशी भूमिका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मांडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - शिवसेनेला योग्य सन्मान दिला जाणार नसेल तर कशाला जायचे त्या शपथविधी सोहळ्याला अशी भूमिका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मांडली आहे. आज रात्रीपर्यंत आम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले तर शपथविधी सोहळ्याला जायचा विचार करु असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 
भाजपाने महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर विजय मिळवून सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. उद्या वानखेडे स्टेडियमवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे व अन्य शिवसेना नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या सोहळ्याल अनुपस्थित राहण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, जिथे आमचा अवमान केला जातोय त्यांच्या शपथविधी सोहळ्याला का जायचे अशी भावना शिवसेना आमदारांनी व्यक्त केली आहे. आज रात्रीपर्यंत आम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले तरच आम्ही सोहळ्याला उपस्थित राहू असे सूचक विधान त्यांनी केले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधील दुरावा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसते.
विधानसभेत पाठिंबा देण्याबाबत भाजपा आणि शिवसेनेत चर्चा सुरु आहे. मात्र मंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये तणातणी सुरु आहे.  उद्या शिवसेनेचा कोणताही नेता मंत्रिपदाची शपथ घेणार नाही असे भाजपा नेते राजीव प्रताप रुडी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तणावात भर पडली आहे. आज रात्री पाठिंब्यासंदर्भात शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये होणारी बैठकही रद्द झाली आहे.  मनसेध्यक्ष राज ठाकरेही या सोहळ्याला जाणार नाहीत असे समजते.