शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

"मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत"; पंजाबच्या डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 3:03 PM

Farmers Protest: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेले देशव्यापी आंदोलन आजही सुरुच आहे. आज ट्रॅक्टरने रस्ते जाम करण्यात येणार असून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला मोठा झटका लागला आहे.

चंदीगढ : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार परत दिले आहेत. मात्र, ''मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत'' म्हणत पंजाबच्या डीआयजींनी थेट नोकरीवरच लाथ मारली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी (Farmers Protest) डीआयजी (जेल) लखविंदरसिंग जाखड (Lakhwinder Singh Jakhar) यांनी राजीनामा दिला आहे. 

जाखड यांनी राज्याच्या मुख्य गृह सचिवांकडे राजीनामा सोपविला आहे. जाखड यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात मुदतपूर्व रिटायरमेंट घेत असल्याचे म्हटले आहे. ''मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसोबत आहे. यामुळे मी राजीनामा देत आहे.'', असे त्यांनी म्हटले आहे. 

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधून शेतकरी आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन फोडण्यास केंद्र सरकारला यश आले आहे. क्रीडा जगतापासून ते साहित्य जगतापर्यंत अनेकांनी आपले पुरस्कार मागे देण्याचे जाहीर केले आहे. 

 केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेले देशव्यापी आंदोलन आजही सुरुच आहे. आज ट्रॅक्टरने रस्ते जाम करण्यात येणार असून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला मोठा झटका लागला आहे. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी आंदोलन संपविण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील शेतकरी चिल्ला बॉर्डरवरून बाजुला झाले असून नोएडा-दिल्ली वाहतूक सुरु झाली आहे. शेतकरी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कृषी आयोग बनविण्यावरून सहमती बनल्याने हा निर्णय घेतला आहे. 

शेतकरी आंदोलन फुटले; राजनाथ सिंहांना भेटून उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी रस्ते मोकळे केलेरविवारी सकाळी १२ वाजता संघटनांचे पदाधिकारी बैठक घेणार होते. सेक्टर-१४ मध्ये भारतीय किसान युनियन (भानू गट) चे वरिष्ठ पदाधिकारी याबाबतचा निर्णय घेणार आहेत. महत्वाचे म्हणजे दिल्ली-नोएडाच्या चिल्ला सीमेवरील आरएएफ, आरपीएफ देखील हटविण्यात आली आहे. दिल्लीच्या बाजुनेही पोलिसांच्या तुकड्या हटविण्यात  आल्या आहेत.  ही सीमा १२ दिवसांनी पुन्हा वाहतुकीसाठी खुली झाली आहे. चिल्ला सीमेवरील शेतकरी रात्री उशिरा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना जाऊ भेटले होते. यावेळी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमरदेखील होते. दोन्ही पक्षांदरम्यान झालेल्या चर्चेत चिल्ला सीमा खुली करण्यात आली.  या बैठकीत १८ मागण्या ठेवण्यात आल्या. या मागण्यांमध्ये एमएसपीचा उल्लेख नाहीय. मात्र, ही शेतकरी संघटना अन्य मागण्यावरून अडून बसली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपPunjabपंजाबPoliceपोलिसjailतुरुंग