शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आजारावर रामबाण ‘हिप्नॉटिझम’ स्मरणशक्ती, एकाग्रतेतही करता येते वाढ!

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST

रवींद्र देशमुख-सोलापूर : हिप्नॉटिझम अर्थात संमोहनशास्त्र हे आता केवळ करमणुकीचे साधन राहिलेले नाही. विविध प्रकारच्या मानसिक आणि मनोशारीरिक आजारांवर विनाऔषध इलाज करण्याची ती एक रामबाण उपचार पद्धती म्हणून विकसित झालेली आहे. अर्थातच संमोहनतज्ज्ञांच्या मेहनतीचे हे फळ आहे. संमोहन उपचार केंद्राच्या माध्यमातून सोलापुरातही या आजारावर उपचार करण्यात येत आहेत.

रवींद्र देशमुख-सोलापूर : हिप्नॉटिझम अर्थात संमोहनशास्त्र हे आता केवळ करमणुकीचे साधन राहिलेले नाही. विविध प्रकारच्या मानसिक आणि मनोशारीरिक आजारांवर विनाऔषध इलाज करण्याची ती एक रामबाण उपचार पद्धती म्हणून विकसित झालेली आहे. अर्थातच संमोहनतज्ज्ञांच्या मेहनतीचे हे फळ आहे. संमोहन उपचार केंद्राच्या माध्यमातून सोलापुरातही या आजारावर उपचार करण्यात येत आहेत.
डॉ. रवींद्र सोरटे आणि अलका सोरटे या दाम्पत्याने स्वत:ला संमोहनशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वाहून घेतले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते यासाठी संशोधन आणि अभ्यास करीत आहेत.
सध्याचं धकाधकीचं जीवन आणि भौतिक सुखांचा पाठलाग यामुळे बहुसंख्यांचं जीवन तणावपूर्ण झालेले आहे. या स्थितीमुळे लोक मानसिक आजाराचे शिकार होत आहेत, असे डॉ. सोरटे सांगत होते. मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी अँलोपॅथी, आयुर्वेदामध्ये प्रभावी उपचार पद्धती आहेत; पण तत्पूर्वी संमोहनशास्त्राच्या उपचार पद्धतीचाही उपयोग करून घ्यायला हरकत नाही, असे ते म्हणाले.
इन्फो बॉक्सेस...
या आजारांवर नियंत्रण
अनेक आजारांचे मूळ हे ताणतणावात असते. रक्तदाब, हृदयरोग, दमा, मधुमेह, लैंगिक आजार हे आजार तणावपूर्ण जीवनशैलीमुळेच जडतात. हिप्नॉटिझमच्या माध्यमातून माणसावरील तणाव नक्कीच कमी करता येतो. एकदा का तणाव कमी झाला; तर आपोआपच वरील आजारावर नियंत्रण येते.
सेल्फ हिप्नॉटिझम..
माणसाच्या अंतर्मनाला जागृत करून त्याला सकारात्मक संदेश देण्याच्या प्रक्रियेला स्वसंमोहन किंवा सेल्फ हिप्नॉटिझम म्हणतात. यामुळे हस्तकंप, तोतरेपणा, भीती, भयगंड, न्यूनगंड, चिंता, नैराश्य आदींवर मात करता येते. शिवाय स्मरणशक्ती आणि एकाग्रतेमध्ये वाढ करता येते.
गैरसमज़़़
संमोहनशास्त्राबाबत बरेच गैरसमजही पसरविले जातात. हिप्नॉटिझममुळे कुणालाही फसविता येत नाही. शिवाय चोरी, खून, दरोडे अशी अनैतिक कृत्ये करता येत नाहीत. कारण संमोहन करून घेण्यासाठी समोरची व्यक्ती तयार असावी लागते आणि त्याने संमोहन तज्ज्ञाच्या सूचनांचे पालन करावे लागते. हिप्नॉटिझम कुणाच्याही मनाविरुद्ध करता येत नाही, असे डॉ. सोरटे यांनी स्पष्ट केले.
कोट.........
हिप्नॉटिझम उपचार पद्धतीला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू. एच. ओ.) शास्त्र म्हणून मान्यता दिली आहे. शिवाय एक उपचार पद्धती म्हणून भारत सरकारचीही मान्यता आहे. मुळातच संमोहनशास्त्र हे वैद्यकशास्त्राला मोलाची मदतच करते हेही सिद्ध झालेले आहे.
डॉ. रवींद्र सोरटे
संमोहनतज्ज्ञ, सोलापूर