शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:54 IST

Hyderabad Crime: प्रेमसंबंध आणि गर्भधारणेच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र वादानंतर हैदराबाद येथील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रेमसंबंध आणि गर्भधारणेच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र वादानंतर हैदराबाद येथील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणाचे त्याच्या लहापणीच्या मैत्रीणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून ती गर्भवती राहिली आणि याबाबत तिने आपल्या आईला सांगितले. त्यानंतर आईने तिच्या प्रियकराला बोलावून घेतले आणि दोघांनाही झापले. लग्नाआधीच मुलगी गर्भवती राहिल्याने संतापलेल्या महिलेने जवळच पडलेल्या बॅटने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलीला वाचवण्यासाठी तिचा प्रियकर मध्ये पडला. पण त्यावेळी त्याच्या डोक्याला बॅट लागली आणि तो गंभीर जखमी झाला. पहाटे त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अमीनपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के. ज्योती श्रवण साई, असे मृत तरुणाचे नाव असून तो गांधीमैसम्मा येथील एका खाजगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. साईचे त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध होते. सोमवारी त्या मुलीला कळले की ती गर्भवती आहे. तिने मंगळवारी ही गोष्ट आपल्या आईला सांगितल्यावर त्यांच्यात मोठा वाद झाला. आईने अधिक चौकशी केल्यावर मुलीने कबूल केले की, ती साईसोबत प्रेमसंबंधात आहे. त्यानंतर मुलीच्या आईने साईला घरी बोलावण्यास सांगितले.

साई सकाळी ११ च्या सुमारास गांधीमैसम्मा येथील वसतिगृहातून मुलीच्या घरी आला. मुलीच्या आईने गर्भधारणेच्या मुद्द्यावरून त्याला जाब विचारला आणि दोघांनाही झापले. संतापलेल्या महिलेने मुलीला बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला वाचवण्यासाठी साई मध्ये पडला आणि बॅट त्याच्या डोक्याला लागली. आणि तो जखमी झाला. साई त्याच घरात थांबला आणि वेगळ्या खोलीत झोपला.

दरम्यान, सायंकाळी मुलीने मारहाणीमुळे वेदना होत असल्याची तक्रार केली, म्हणून तिला कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात नेले आणि मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी परतले. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कुटुंबाच्या लक्षात आले की, साईला श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Hyderabad: Teen Pregnancy Leads to Boyfriend's Death After Family Dispute

Web Summary : An engineering student in Hyderabad died after a dispute over his girlfriend's pregnancy. The girl's mother, enraged, assaulted her daughter. The boyfriend intervened, sustained a head injury, and later died at the hospital. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhyderabad-pcहैदराबाद