हम दिल दे चुके सनम! तरुणाने पत्नीचं प्रियकरासह लावलं लग्न; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 12:16 PM2023-09-24T12:16:39+5:302023-09-24T12:22:18+5:30

एक प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरच्या घरी पोहोचला. हा प्रकार प्रेयसीच्या पतीला समजताच त्याने पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले.

hum dil de chuke sanamrepeated husband got wife married to her lover | हम दिल दे चुके सनम! तरुणाने पत्नीचं प्रियकरासह लावलं लग्न; नेमकं काय घडलं?

फोटो - आजतक

googlenewsNext

बॉलिवूडच्या ‘हम दिल दे चुके सनम’सारखी गोष्ट उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये पाहायला मिळाली. येथे एक प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरच्या घरी पोहोचला. हा प्रकार प्रेयसीच्या पतीला समजताच त्याने पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. हा अनोखा विवाह सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

देवरिया जिल्ह्यातील बरियारपूर नगर पंचायत पोलीस ठाण्याशी हे प्रकरण संबंधित आहे. बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यातील थाना भोरे भागातील एका गावात राहणाऱ्या तरुणाचं वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं. सर्व काही सुरळीत चाललं होतं मात्र शुक्रवारी रात्री बिहारच्या भोरे येथील रहिवासी असलेल्या पत्नीचा प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी अचानक बरियारपूर येथील तिच्या सासरच्या घरी पोहोचला. त्याला घरात पकडल्यानंतर गावकरी जमा झाले. प्रियकराला जबर मारहाण करण्यात आली.

प्रियकराला एवढी मारहाण होत असल्याचे पाहून प्रेयसीने पतीला सोडून देण्याची विनवणी सुरू केली. हे पाहून आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न करण्याचा पतीने निर्णय घेतला. पतीने आधी घरातील सदस्यांना आणि सासरच्या लोकांना समजावले. त्यांनी या लग्नाला होकार दिल्यावर पतीने पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी मंदिरात करून दिले. 

बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील भोरे पोलीस ठाण्याच्या रेडवारिया गावातील रहिवासी आकाश शाहने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे शेजारच्या गावात राहणाऱ्या एका मुलीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तो वेल्डिंगचे छोटे काम करतो. दरम्यान, वर्षभरापूर्वी देवरियाच्या बरियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचे लग्न झाले, मात्र तो आपल्या प्रेयसीला विसरू शकला नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री तो तिला भेटण्यासाठी सासरच्या घरी पोहोचला. गावकऱ्यांनी तेथे त्याला मारहाण केली. मात्र नंतर त्याने प्रेयसीशी लग्न केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: hum dil de chuke sanamrepeated husband got wife married to her lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न