विमा प्रतिनिधींचे घंटानाद आंदोलन
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
फोटो अजय यांच्याकडे
विमा प्रतिनिधींचे घंटानाद आंदोलन
फोटो अजय यांच्याकडेपुणे : केंद्र सरकारने आणलेल्या विमा विधेयकाला विरोध करण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरशन ऑफ इंडियाच्यावतीने आज शिवाजीनगर येथील एलआयसीच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.विमाधारक व प्रतिनिधींच्या विविध मागण्याही यावेळी संघटनेने केल्या. या आंदोलनात फेडरशचे सचिव सुधीर पाध्ये, पुणे विभागाचे अध्यक्ष प्रशांत तरडे, सुभाष बोरा आदी सहभागी झाले होते. यावेळी पाध्ये म्हणाले, केंद्र सरकारने विमा कायद्यात केलेल्या बदलांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. केंद्राने विमाविषयक वटहुकूम काढून लोकसभा व राज्यसभेत विमा कायदा मंजूर करून घेतला. या नव्या कायद्यात काही कलम वगळण्यात आले आहेत. त्यामुळे विमाप्रतिनिधींना मिळणारा कामाचा मोबदला बंद होणार आहे. त्यामुळे आम्ही त्याला विरोध केला आहे. याचा सरकारने गांभिर्याने विचार करून योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा तरडे यांनी दिला.