राज्याला भरली हुडहुडी!

By Admin | Updated: December 23, 2016 19:57 IST2016-12-23T19:57:09+5:302016-12-23T19:57:09+5:30

पुणे : मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात थंडीची लाट आली असून, किमान तापमानात मोठी घट झाली आहे. बुधवारच्या तुलनेत अनेक ठिकाणी गुरुवारी तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने उतरले आहे. राज्यातील सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे ५.८ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले.

Hoodhuman full of the state! | राज्याला भरली हुडहुडी!

राज्याला भरली हुडहुडी!

णे : मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात थंडीची लाट आली असून, किमान तापमानात मोठी घट झाली आहे. बुधवारच्या तुलनेत अनेक ठिकाणी गुरुवारी तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने उतरले आहे. राज्यातील सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे ५.८ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले.
छत्तीसगड आणि विदर्भात कालपासूनच थंडीची लाट आहे. पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे़ मराठवाड्यातही चांगलाच गारठा पडला आहे. परभणी जिल्‘ाचा पारा ६.७ अंशापर्यंत घसरला.
प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ९़००, जळगाव ८.४, महाबळेश्वर १४.६., मालेगाव १०.४, , सांगली १२.००, सातारा १०.९, अलिबाग १७.६, रत्नागिरी १६.६, पणजी १९.९, , डहाणू १८, भिरा १५.५, सोलापूर १०.९, उस्मानाबाद १०.७, औरंगाबाद १०.७, परभणी १०.७, नांदेड ११.००, अकोला १०़००, अमरावती ९.६, बुलडाणा १२़२, ब्रšापुरी ११.३, चंद्रपूर १०.६, गोंदिया ८.३, नागपूर९़१, वाशिम १६.२, वर्धा १०.५ व यवतमाळ १०़२़ (प्रतिनिधी)
..................

Web Title: Hoodhuman full of the state!