हिमाचल : आणखी एक मृतदेह सापडला

By Admin | Updated: June 11, 2014 23:35 IST2014-06-11T23:35:15+5:302014-06-11T23:35:15+5:30

बियास नदीत वाहून गेलेल्या हैदराबाद अभियांत्रिकी महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांपैकी आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह आज बुधवारी बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आले़

Himachal: Another body was found | हिमाचल : आणखी एक मृतदेह सापडला

हिमाचल : आणखी एक मृतदेह सापडला

मंडी : अचानक पाण्याचा लोंढा आल्याने बियास नदीत वाहून गेलेल्या हैदराबाद अभियांत्रिकी महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांपैकी आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह आज बुधवारी बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आले़ मोहम्मद शबीर हुसैन शाईक असे या विद्यार्थ्याचे नाव आहे़ तथापि, अद्यापही १९ जण बेपत्ता आहेत़ दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी लार्जी जलविद्युत प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तेलंगण सरकारने मागितली लष्कराची मदत
विद्यार्थ्यांच्या शोधासाठी तेलंगण सरकारने लष्कराची मदत मागितली आहे़ खुद्द घटनास्थळी उपस्थित असलेले तेलंगणचे गृहमंत्री नयानी नरसिम्हा रेड्डी यांनी ही माहिती दिली़ आमचे एक नेते आज बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना भेटले व त्यांच्याकडे ही मागणी केली, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Himachal: Another body was found