पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:55 IST2025-08-26T16:50:26+5:302025-08-26T16:55:02+5:30

Beas River Flood Video: हिमाचल प्रदेशला पुन्हा एकदा पावसाने तडाखा दिला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने भूस्खलन झाले आहे. त्यामुळे परिस्थिती पुन्हा बिघडली असून, व्यास नदीनेही प्राचीन मंदिराला वेढा दिला आहे. 

Heavy rains! The raging beas river engulfed the ancient Panjavaktra Mahadev temple; Watch the video | पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा

पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा

Himachal Pradesh Rain Videos: हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान सुरू आहे. सोमवारपासून सक्रिय झालेल्या पावसामुळे अनेक भागात हाहाकार उडाला आहे. मंडी, कांगदा, चंबा, कुल्लू या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, नद्यांची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. अशातच व्यास नदीच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मंडी जिल्ह्यात व्यास नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ड्रोन व्हिडीओमध्ये पाणी नदीच्या पात्राबाहेर गेले असून, अनेक ठिकाणी गावांमध्येही शिरले आहे. 

प्राचीन मंदिराचा काही भाग पाण्यात

मंडीमध्ये व्यास नदीच्या काठावरच ऐतिहासिक पंजवक्स्र महादेव मंदिर आहे. हे मंदिर ३००-३५० वर्षे जुने असल्याचे स्थानिक सांगतात. या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सध्या पावसामुळे मंदिराला पुराचा वेढा पडला आहे. 

महादेव मंदिराचा बहुतांश भाग व्यास नदीच्या पाण्याखाली गेला आहे. मंदिराचा कळस आणि मंडपच दिसत आहे. 
 
व्यास नदीच्या पुराचा महादेव मंदिराला वेढा, व्हिडीओ पहा

व्यास नदी खवळली, महामार्ग गेला वाहून

व्यास नदीच्या पाण्यात चारपदरी महामार्गही वाहून गेला आहे. व्यास नदीच्या काठावर असलेल्या अनेक भागांमधील घरेही वाहून गेली आहेत. 

हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी ढगफुटी झाल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. हिमाचलमधील किन्नोर जिल्ह्यात, तर जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने पूर परिस्थिती उद्भवली आहे. हिमाचलमध्ये सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे रावी आणि सतलज या नद्यांनाही पूर आला आहे. 

व्यास नदीचे पात्र खवळलेले आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे व्यास नदीचे पाणी चंदीगढ मनाली राष्ट्रीय महामार्गावर आले होते.

Web Title: Heavy rains! The raging beas river engulfed the ancient Panjavaktra Mahadev temple; Watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.