काळजाचा थरकाप उडवणारा अपघात...! बसची ट्रेलरला धडक, ६ ठार, ७ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 21:17 IST2026-02-27T21:16:56+5:302026-02-27T21:17:54+5:30

या भीषण अपघातानंतर पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Heart-wrenching accident Bus hits trailer 6 dead, 7 critically injured | काळजाचा थरकाप उडवणारा अपघात...! बसची ट्रेलरला धडक, ६ ठार, ७ गंभीर

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात...! बसची ट्रेलरला धडक, ६ ठार, ७ गंभीर

राजस्थानातील बालोतरा जिल्ह्यातील सरवडी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. महामार्गावरून जाणाऱ्या एका स्लीपर बसने समोर जात असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की बसची उजवी बाजू पुर्ण पणे क्षतिग्रस्त झाली. या अपघातात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर झाल्याचे समजते.

प्रवाशांचे मृतदेह बसच्या खिडक्यांबाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसले - 
अपघातानंतर घटनास्थळी अतिशय विदारक दृश्य बघायला मिळाले. माध्यमांतील वृत्तांनुसार, ही धडक एवढी भीषण होती की काही प्रवाशांचे रक्ताळलेले मृतदेह बसच्या खिडक्यांमधून बाहेर लटकलेल्या अवस्थेत होते. या भयानक दृश्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान हायवेच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले.

ग्रीन कॉरिडोरद्वारे जखमींवर उपचार
जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ७ प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्यांना 'ग्रीन कॉरिडोर' तयार करून जोधपूरमधील मथुरा दास माथूर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत प्रवाशांचे देह नाहटा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असून, त्यांची ओळख पटवून नातेवाईकांशी संपर्क साधला जात आहे.

या भीषण अपघातानंतर पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 

Web Title : राजस्थान में भीषण बस-ट्रेलर टक्कर: छह की मौत, सात गंभीर रूप से घायल

Web Summary : राजस्थान में एक भयानक बस दुर्घटना में छह लोगों की मौत हो गई और सात गंभीर रूप से घायल हो गए। एक स्लीपर बस राजमार्ग पर एक ट्रेलर से टकरा गई। टक्कर इतनी भीषण थी कि दृश्य भयावह था। घायलों को ग्रीन कॉरिडोर के जरिए जोधपुर पहुंचाया गया।

Web Title : Horrific Bus-Trailer Collision in Rajasthan: Six Dead, Seven Critically Injured

Web Summary : A devastating bus accident in Rajasthan killed six and critically injured seven. A sleeper bus collided with a trailer on a highway. The impact was severe, leaving a gruesome scene. Injured were rushed to Jodhpur via green corridor.