सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर आज सुनावणी

By Admin | Updated: July 12, 2016 00:10 IST2016-07-12T00:10:05+5:302016-07-12T00:10:05+5:30

जळगाव : घरकूल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीच्या माहितीचा अहवाल न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने, जिल्हा व सत्र न्यायालयात घरकूल प्रकरणाची स्थिती काय आहे? याचा अहवाल (केस स्टेटस डिटेल्स) सादर करण्याचे आदेश सरकार पक्षाला दिले आहेत. सुरेशदादा जैन यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.कपिल सिब्बल कामकाज पाहत आहेत.

Hearing on Sureshdda Jain's bail today | सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर आज सुनावणी

सुरेशदादा जैन यांच्या जामिनावर आज सुनावणी

गाव : घरकूल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीच्या माहितीचा अहवाल न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने, जिल्हा व सत्र न्यायालयात घरकूल प्रकरणाची स्थिती काय आहे? याचा अहवाल (केस स्टेटस डिटेल्स) सादर करण्याचे आदेश सरकार पक्षाला दिले आहेत. सुरेशदादा जैन यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.कपिल सिब्बल कामकाज पाहत आहेत.

Web Title: Hearing on Sureshdda Jain's bail today