शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 16:47 IST

CJI B R Gavai news: सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात आलेल्या बी.आर. गवई यांच्या स्वागतासा महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अनुपस्थित होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सरन्यायाधीश गवईंनी याचिका दाखल करणाऱ्या वकिलालाच झापले.

Chief Justice of India News: राज्यातील अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचार पाळला न गेल्याबद्दल सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर चर्चा सुरू झाल्यानंतर हा विषय सोडून द्या, असेही ते म्हणाले होते. पण, एका वकिलांना या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश बी. आर. गवई चांगलेच संतापले. राईचा पर्वत केला, असे म्हणत सरन्यायाधीशांना वकिलाला सात हजारांचा दंडही ठोठावला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिका करणारे वकील सात वर्षांपासून वकिली करत आहेत. त्यामुळे त्यांना ७ हजारांचा दंड ठोठावत आहोत आणि हे प्रकरण आम्ही इथेच संपवत आहोत, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले. 

कोणत्या मागणीसाठी केली होती याचिका?

सरन्यायाधीश पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर असताना महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांनी राजशिष्टाचाराचे पालन केले नाही. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. 

सरन्यायाधीश गवई काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखाली या याचिकेवर सुनावणी झाली. 

सरन्यायाधीश गवई म्हणाले, "ही याचिका प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा प्रयत्न आहे. वर्तमानपत्रात नाव छापून यावे म्हणून ही याचिका केली गेली आहे. जर तुम्ही वकील आहात, तर तुम्हाला माहिती असले पाहिजे की, मी स्वतः स्पष्ट केले की, या शुल्लक गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका."

वाचा >>पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल  "आम्ही इथे स्पष्ट करतो की, सरन्यायाधीशांना एक व्यक्ती म्हणून त्यांना दिलेल्या वागणुकीबद्दलची चिंता नाहीये. तर लोकशाहीचे एक महत्त्वाचे अंग असलेल्या संस्थेचे प्रमुख म्हणून सरन्यायाधीश पदाची गरिमा राखली जावी म्हणून चिंता व्यक्त केली होती", असे सरन्यायाधीश गवई म्हणाले. 

"या प्रकरणाला जास्त महत्त्व न देण्याचे आवाहन आधीच केले आहे. याला आता अनावश्यकपणे वाढवू नका. राईचा पर्वत करण्याच्या या परंपरांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो", असेही सर्वोच्च न्यायालय यावेळी म्हणाले आणि याचिका फेटाळून लावली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्र