Hathras Case: उत्तर प्रदेशच्या बाहेर खटला चालणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

By कुणाल गवाणकर | Updated: October 27, 2020 14:34 IST2020-10-27T14:33:50+5:302020-10-27T14:34:13+5:30

Hathras Case: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालणार खटला- सर्वोच्च न्यायालय

Hathras Case Allahabad High Court To Monitor CBI Probe Says Supreme Court | Hathras Case: उत्तर प्रदेशच्या बाहेर खटला चालणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Hathras Case: उत्तर प्रदेशच्या बाहेर खटला चालणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हाथरस प्रकरणी सुरू असलेला खटला राज्याबाहेर चालवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्याची सुनावणी राज्याबाहेर चालवण्याबद्दल विचार केला जाऊ शकतो, असं न्यायालयानं निकालात म्हटलं. अलाहाबाद उच्च न्यायालय या प्रकरणाची देखरेख करेल, असंदेखील न्यायालयानं सांगितलं.

सध्या या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू आहे. त्यामुळे हा खटला तातडीनं वर्ग करण्याची गरज नाही. इतर सर्व गोष्टींकडे उच्च न्यायालयाचं लक्ष असेल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सुनावणीदरम्यान न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारचं प्रतिज्ञापत्र स्वीकारलं. सरकार पीडित कुटुंबाला आणि खटल्याशी संबंधित साक्षीदारांना सुरक्षा पुरवत असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारनं प्रतिज्ञापत्रात दिली आहे. 




प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीची आवश्यकता नाही. खटल्यावरील सुनावणी प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे खटला दिल्ली किंवा इतर ठिकाणी हलवण्याचा विचार केला जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीवेळी म्हटलं.

१६ सप्टेंबरला उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. अत्याचार करणाऱ्या नराधमांनी तिची जीभदेखील कापली. पीडित तरुणी अनेक दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. २९ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. या तरुणीच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी घरातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. त्यामुळे प्रचंड वाद झाला. यानंतर प्रकरण उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेलं.

Web Title: Hathras Case Allahabad High Court To Monitor CBI Probe Says Supreme Court