जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:20 IST2025-10-12T11:19:35+5:302025-10-12T11:20:11+5:30
सोनीपतच्या गोहाना येथे एक भीषण अपघात झाला आहे. काँग्रेस नेत्याच्या मुलासह चार तरुणांचा मृत्यू झाला.

जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
सोनीपतच्या गोहाना येथे एक भीषण अपघात झाला आहे. काँग्रेस नेत्याच्या मुलासह चार तरुणांचा मृत्यू झाला. रोहतक जिल्ह्यातील चार तरुण जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवरून रोहतकमधील त्यांच्या गावी कारने जात होते. रुखी गावाजवळ एक्स्प्रेसवेवरील टोलजवळ कारची रोड रोलरशी धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तिघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहतक जिल्ह्यातील घिलोद गावातील रहिवासी अंकित, लोकेश, दीपक आणि सोमबीर हे काही कामासाठी जिंदहून परतत होते. रुखी गावाजवळ एक्सप्रेसवेवरील टोलजवळ ते जम्मू-कटरा एक्सप्रेसवेवरून प्रवास करत असताना तिथे बांधण्यात येणाऱ्या रोड रोलरशी टक्कर झाली. एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तिघांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
कारमधील तरुण सोमबीर हा रोहतक जिल्ह्यातील ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बलवान रंगा यांचा मुलगा आहे. गावातील सरपंचांनी सांगितलं की, हे तरुण घरी परतत होते. त्यांची कार जम्मू-कटरा एक्सप्रेसवेवर रोड रोलरला धडकली आणि एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. यात आमच्या माजी सरपंचाचा मुलगा देखील आहे.
पोलीस तपास अधिकारी देवेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी आम्हाला चार तरुणांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या सर्वांचे पोस्टमॉर्टम केले जाईल. ते जम्मू-कटरा बाजूने रोहतक रोडवर जात असताना त्यांची कार टोलजवळ रोड रोलरला धडकली.