शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन पाटलांपुढे महाआघाडीचे आव्हान

By admin | Updated: September 18, 2014 12:59 IST

यंदाच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्याच्या विकासाचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षापासून सुटले नसल्याचा आरोप होत आहे.

पुणो :  यंदाच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्याच्या विकासाचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षापासून सुटले नसल्याचा आरोप होत आहे.  सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील यांना या  स्थानिक प्रश्नांनीच ग्रासले आहे. 2क्क्9 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणो यांनी महाआघाडीच्या माध्यमातून तुल्यबळ लढत दिली. पाटील यांना निसटता विजय मिळवता आला. परंतु, यंदा स्थानिक प्रश्न निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चीले जाऊ लागल्याने पाटील यांच्यापुढे महाआघाडीचे मोठे  आव्हान आहे. 
नगरपालिकेची सत्ता असतानाही शहरातील बकालपणा कमी करण्यासाठी कोणत्याही उपाय योजना केल्या नाहीत. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक पुढा:यांकडूनच हर्षवर्धन पाटील यांना यंदाही आव्हान मिळू शकते. महाआघाडीच्या प्रयोगाबरोबरच काही मंडळी थेट भाजपात प्रवेश करून पाटील यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणो, जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्यापैकी कोणीतरी पाटील यांच्या विरोधात   रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जातीय समिकरणात धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील विरोधकांकडून तापविण्यात येत आहे. 2क्क्9 पासून इंदापूर तालुक्यात घट्ट झालेले  जातीय राजकारण आणि  त्यातच धनगर आरक्षणाचे आंदोलन यामुळे कॉँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. 
कॉँग्रेस बरोबर राष्ट्रवादीची आघाडी झाली  तरी राष्ट्रवादीचा इंदापूर तालुक्यातील मोठा गट हर्षवर्धन पाटील यांचे कामच करीत नाही. याचा प्रत्यय 2क्क्9 च्या निवडणूकीत आला होता.
 इंदापूर तालुक्यातही अनेक प्रश्न आहेत. निरा भीमा स्थिरीकरण योजनेसह सिंचनाचे प्रकल्प रखडले आहेत.
 बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिक वसाहतीत मोठे प्रकल्प आलेले नाहीत. क् वर्षापासून एमआयडीसीसाठी घेतलेली जागा पडून आहे. काही छोटे प्रकल्प वगळता एमआयडीसीत रोजगार निर्मितीसाठी काही झाले नाही. फक्त कुरघुडय़ांचे राजकारण झाले आहे. त्याचे उत्तर हर्षवर्धन पाटील  यांना यंदाच्या निवडणुकीत द्यावे लागणार आहे.  (वार्ताहर)
 
इंदापूरकरांचा सतत दुष्काळाशी सामना
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याचा सर्वागिण विकासासाठी फारसे लक्ष दिले नाही, असा विरोधकांचा आरोप आहे.  सर्व सत्ताकेंद्रावर घरातील मंडळींचा प्रभाव ठेवला. मागील 2क् वर्षापासून पंचतारांकीत एमआयडीसीत मोठे प्रकल्प आले नाहीत. 22 गावांना बारमाही पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईचा दरवर्षी सामना करावा लागतो. त्याच बरोबर लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना दर पाच वर्षात निवडणूूक प्रचार काळात मार्गी लावू, असे पाटील यांनी आश्वासन दिले. या भागात सतत दुष्काळाशी सामना शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत.