शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग कंपनीचे संतापजनक कृत्य

By admin | Updated: February 17, 2016 02:00 IST

अजनीतील डौलदार वृक्ष तोडले : नागरिकांमध्ये तीव्र रोष

अजनीतील डौलदार वृक्ष तोडले : नागरिकांमध्ये तीव्र रोष
नागपूर : अजनीच्या राजीव गांधी चौकाची शान असलेले आणि अनेकांना छाया देणारे हिरवेगार वृक्ष एका ॲड एजन्सीने तोडल्यामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांनी याप्रकरणी पोलीस तसेच संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.
अजनीचा रणगाडा चौक, राजीव गांधी पुतळ्याजवळ अशोका आणि हिरड्यांचे हे डौलदार वृक्ष होते. १२ महिने त्यांना या भागातील मंडळी पाणी देत असल्याने ते हिरवेकंच होते. पर्यावरणाचा समतोल साधण्यासोबतच ते वृक्ष सावली देत होते. याच ठिकाणी कार्टेल कंपनीने एक होर्डिंग लावले होते. उंच आणि डौलदार वृक्षामुळे हे होर्डिंग एका दिशेने दिसत नसल्यामुळे मंगळवारी सायंकाळी ॲड एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी या वृक्षांची कटाई केली. कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रीक मशीनने झटपट ही झाडे कापली अन् निघूनही गेले. दरम्यान, परिसरातील नागरिकांना हे माहीत झाल्याने तेथे मोठी गर्दी जमली. महापालिकेने झाडे कापली असावीत, असा समज झाल्यामुळे नागरिकांनी घोषणाबाजी सुरू केली. तणाव निर्माण झाल्याचे कळताच या भागाचे नगरसेवक मुन्ना यादव तेथे पोहचले. त्यांनी चौकशी केली असता हे काम ॲड एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचे असल्याचे कळले. त्यामुळे यादव यांनी धंतोली पोलीस तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठांना तक्रारी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
--
दोषींना सोडणार नाही
हे वृक्ष चौकाची शोभा होते. होर्डिंग दिसत नाही म्हणून संबंधित कंपनीच्या माणसांनी कुणाची परवानगी न घेता ते तोडले. हा प्रकार संतापजनक आणि निषेधार्ह आहे. नागरिकांमध्येही त्यामुळे रोष निर्माण झाला असून, दोषी कंपनीच्या संचालकांवर कडक कारवाई होईपर्यंत आपण हे प्रकरण रेटून धरणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया मुन्ना यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
---
फोटो- आहे