हार्दिक पटेलला जीवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: October 16, 2016 02:28 IST2016-10-16T02:28:45+5:302016-10-16T02:28:45+5:30

गुजरात पाटीदार आंदोलनाचे संयोजक हार्दिक पटेल यांना फोनवरुन जीवानिशी ठार करण्याची धमकी देण्यात आली.

Hardik Patel threatens to kill him | हार्दिक पटेलला जीवे मारण्याची धमकी

हार्दिक पटेलला जीवे मारण्याची धमकी

>ऑनलाइन लोकमत
उदयपूर, दि.16 -  गुजरात पाटीदार आंदोलनाचे संयोजक हार्दिक पटेल यांना फोनवरुन जीवानिशी ठार करण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भात उदयपूर येथील प्रतापनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत पटेल यांनी आरोपीचा मोबाइल क्रमांक दिला असून धमकी बाबत माहिती दिली. घरच्यांचे अपहरण करण्याची धमकीही देण्यात आली आहे. गुजरात पाटीदार आंदोलनापासून हटविण्यासाठी रचलेला हा कट आहे, असे नमूद करीत हार्दिक यांनी फोनकर्त्याने माझ्या परिवारासाठी अपशब्द वापरल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हार्दिक पटेल गत १९ जुलैपासून उदयपूरमध्ये राहत आहे.

Web Title: Hardik Patel threatens to kill him