शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

रस्त्यांवरील अपघातात हकनाक माणसे मरतात, त्याची आहेत ८ कारणे; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 8:57 AM

आपल्याकडे वाहतूक या विषयाबाबत पाहिजे तेवढी जागरूकता नाही. 

भारतात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वांत जास्त मृत्यू हे रस्ते अपघातात होतात, तरीही वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ का करीत असावेत?

  • १.  आपल्याकडे वाहतूक या विषयाबाबत पाहिजे तेवढी जागरूकता नाही. 
  • २. वाहतूक मंत्रालय नियम करून मोकळे होते आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आरटीओ, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस इ. यंत्रणांवर असते. ते  एखादा अपघात झाल्यानंतरच ॲक्शन मोडमध्ये येतात.
  • ३. वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करून वाहने चालवण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसे नसते.  पुरेसे रुंद, खड्डेविरहित रस्ते, डिव्हायडर, फुटपाथ, सिग्नल, साइन बोर्ड इ. सुविधा अद्ययावत नसतात.
  • ४. भारतीय लोकांचे वाइट टाइम मॅनेजमेंट! ज्या ठिकाणी जायला १५ मिनिटे लागतात तिथे ५ मिनिटे एक्स्ट्रा राखीव ठेवून निघाले पाहिजे; पण बहुतेक लोक ५ मिनिटे उशिराच निघतात. म्हणजे पोहोचायला १५ मिनिटे लागत असतील तर हे लोक १० मिनिटे बाकी असताना निघतात. मग वेळेवर पोहोचण्यासाठी नियम मोडण्याशिवाय पर्याय नसतो.
  • ५. बेजबाबदार आणि कायदा न जुमानणारे लोक  जेव्हा वाहतुकीचे नियम मोडतात तेव्हा ते नियम पाळणार्या लोकांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो.  त्यांच्या मनातील कायद्याविषयीचा आदर आपसूकच कमी होतो.
  • ६. बऱ्याच लोकांना  वाहतुकीचे सगळे नियम माहीतच नसतात, कारण पैसे भरून वाहन चालक परवाना सहज मिळविता येऊ शकतो. 
  • ७. रस्त्यावर एकाच वेळी ताशी ५ किमी वेगाने चालणाऱ्या बैलगाडीपासून ते थेट ताशी २०० किमी वेगाने धावणाऱ्या गाड्यांचा समावेश असतो. त्या प्रत्येकासाठी वेगळी लेन करणे शक्य नाही. त्यासाठी परिस्थितीनुसार वेग नियंत्रित ठेवणे इतकेच आपल्या हातात आहे.
  • ८. अवजड वाहनांच्या चालकांना पुरेशी विश्रांती न मिळणे, त्यांची व्यसनाधीनता!  हे चालक अतिशय विपरीत परिस्थितीत, वेगवेगळ्या हवामानात रात्रंदिवस वाहने चालवीत असतात. महामार्गावर ठराविक अंतरावर चालक सुविधा केंद्र निर्माण करणे आवश्यक आहे. 

- पंजाबराव देशमुख, औरंगाबाद

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू