Join us  

Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 2:37 PM

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumors: सोशल मीडियावर हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची चर्चा आहे. मात्र, याबाबत दोन्हीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumors: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे. आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. मात्र, याबाबत दोन्हीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

या चर्चा सुरू असतानाच हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. कृणाल पांड्या सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्य आणि त्याचा मुलगा कवीर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला असून नताशा स्टॅनकोविकनेही कृणालच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. नताशाची ही कमेंट पाहून चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर नताशाने हार्ट इमोजी शेअर केला आहे. नताशाची ही कमेंट पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. अनेकांचा असा विश्वास आहे की दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे, तर अनेकांच्या मते नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.

Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...

हार्दिक आणि नताशामध्ये सर्व काही ठीक चालले आहे असं दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच ते विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नताशा स्टॅनकोविकने तिच्या सोशल मीडियावरून हार्दिकचा फोटो काढून टाकला होता, ज्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या सीझनमध्ये नताशा त्याला आयपीएलमध्ये सपोर्ट करायलाही आली नाही, त्यानंतर सोशल मीडियावर या बातम्या आल्या. ४ मार्च रोजी नताशाचा वाढदिवस होता, त्यावेळीही हार्दिकने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही.

नताशाने आपल्या इंस्टाग्रामवर हार्दिकसोबत एकच फोटो ठेवला आहे, यामध्ये तिचा मुलगाही तिच्यासोबत दिसत आहे. हार्दिक त्याच्या पत्नीला ७० टक्के रक्कम देईल, असं बोलले जात आहे. मात्र, हार्दिक आणि नताशा यांनी आतापर्यंत या अफवांवर मौन बाळगले आहे. 

हार्दिक टीम इंडियाच्या पहिल्या बॅचसोबत रवाना झाला नाही. हार्दिक काही दिवसांनी टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. दुसरीकडे, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हार्दिकची कामगिरी खराब झाली होती. त्याची मुंबई इंडियन्स टीम शेवटच्या स्थानावर राहिली. 

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचक्रुणाल पांड्या