शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 11:56 AM

loksabha Election - संजय राऊतांनी नितीन गडकरींबाबत केलेल्या दाव्यानंतर आता भाजपापाठोपाठ काँग्रेसनेही राऊतांना फटकारलं आहे. 

नागपूर - Vikas Thackeray on Sanjay Raut ( Marathi News ) मी कुणाचीही रसद घेण्याइतपत भिकार XX नाही. ९ व्यांदा निवडणूक लढतोय. तुम्हाला भाजपात भांडणं लावायचा धंदा दिलाय का? तुमचं नेमकं काम काय आहे? महाविकास आघाडीतला एक पक्ष अशाप्रकारे विधानं करत असेल तर काँग्रेसनं त्यांना समज द्यावी. मी वरिष्ठांना आज याविषयी पत्र लिहिणार आहे. हे लिहिण्यामागचा उद्देश काय, तुम्ही गडकरींच्या बाजूने होता का? अशा शब्दात नागपूरचे काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला आहे. 

विकास ठाकरे म्हणाले की, संजय राऊत जे काही बोलतात, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं, उगाच वायफळ बडबड करून प्रसिद्धीसाठी बोलू नये. गडकरींबाबत त्यांचे प्रेम काय हे निवडणुकीआधी ते बोलले होते म्हणून मी कुणालाच प्रचाराला बोलावलं नाही. त्यांना भाजपाशी काय दुखणं आहे हे त्यांनी पाहावं. परंतु महाविकास आघाडीचा धर्म त्यांनी पाळायला हवा. अन्यथा आम्हाला राऊतांविरोधात बोलायला खूप बोलू शकतो असा इशारा त्यांनी दिला. 

तसेच निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गडकरींची प्रशंसा करत होते. त्यानंतर निवडणूक झाल्यावरही त्यांची प्रशंसा, गडकरींसोबत दुसरा पक्ष काढून महाविकास आघाडी करायची होती. संजय राऊतांनी बोलण्यास तारतम्य बाळगावं. नागपूरच्या विषयात त्यांना कवडीचही माहिती नाही. नागपूरची A, B, C, D ही माहिती नाही असंही विकास ठाकरेंनी सांगत उद्धव ठाकरे गटाला फटकारलं आहे. विकास ठाकरे हे काँग्रेसचे नेते असून नागपूरात नितीन गडकरींविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आहे. 

संजय राऊतांचा दावा काय?

नितीन गडकरींचा नागपूरात पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपूरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपूरात उघडपणे बोलताना दिसतात असा दावा खासदार संजय राऊतांनी केला. 

भाजपानेही राऊतांवर साधला निशाणा

रोज उठायचं आणि खोटं बोलायचं असं राऊतांचे आहे. त्यांनी केलेला आरोप निराधार आहे. एकदा जर तुम्हाला टीव्ही चॅनेलवर रोज दिसायची सवय लागली, वर्तमानपत्रात रोज आपली बातमी, फोटो यावा हे व्यसन जडलं तर अशाप्रकारे आरोप होत असतात. या आरोपात काहीही तथ्य नाही असं सांगत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसVikas Thackreyविकास ठाकरेNitin Gadkariनितीन गडकरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४