शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मार्शल आले नसते, तर उपसभापतींवर हल्ला झाला असता- रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 21:43 IST

राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळावरून सत्ताधाऱ्यांचं टीकास्त्र

नवी दिल्ली: मोदी सरकारनं लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही शेतीशी संबंधित विधेयकं मंजूर करून घेतली. मात्र विधेयकांवर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपसभापतींच्या समोरील नियम पुस्तिकेची तोडफोड केली. माईकहीदेखील तोडण्यात आले. यावरून आता भाजपनं विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारमधील तीन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेत झालेल्या गोंधळावरून विरोधकांवर टीका केली.केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी आणि पीयूष गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचा अनादर झाला. ही घटना अतिशय दु:खद आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांचा विधेयकांना विरोध होता. त्यांनी त्यांच्या जागेवर बसून विधेयकाच्या विरोधात मतदान करायला हवं होतं. उपसभापतींनी १३ वेळा खासदारांना त्यांच्या जागेवर जाण्यास सांगितलं. मात्र तरीही खासदार ऐकले नाहीत. संसदेसाठी कालचा दिवस अतिशय लज्जास्पद होता. माईक तोडण्यात आले. नियम पुस्तिका फाडण्यात आली. त्यावेळी तिथे मार्शल नसते, तर उपसभापतींवर हल्लादेखील झाला असता,' असं प्रसाद म्हणाले.काल सहा मंत्र्यांची पत्रकार परिषद; विरोधकांवर टीकास्त्रराज्यसभेत खासदारांनी घातलेल्या गोंधळावरून काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सहा मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता. 'राज्यसभेत घडलेला प्रकार अतिशय दु:खद, लज्जास्पद आणि दुर्दैवी होता. विरोधकांच्या वर्तणुकीमुळे लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे,' अशा शब्दांत सिंह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. राज्यसभेतल्या गोंधळानंतर राजनाथ यांच्यासह सहा मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं.

'राज्यसभेत शेतीशी संबंधित २ विधेयकांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी सदनात जो प्रकार घडला, तो अतिशय दु:खद आणि दुर्दैवी होता. यापेक्षा पुढे जाऊन बोलायचं झाल्यास झालेली घटना लज्जास्पद होती, असं मी म्हणेन. राज्यसभेच्या उपसभापतींना काय वागणूक देण्यात आली, ती सर्वांनी पाहिली,' असं राजनाथ म्हणाले. 'विरोधी पक्षाच्या खासदारांच्या वर्तनामुळे लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. जेव्हा जेव्हा संसदेत मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा तेव्हा लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो. सभागृहात चर्चा घडवून आणणं सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. पण संसदेची प्रतिष्ठा राखणं विरोधकांचंही कर्तव्य आहे,' असं सिंह यांनी म्हटलं.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा