गुरुनाथ कटारे खून खटला औटींच्या न्यायालयात वर्ग आरोपी झाले हजर : चौघांवर खटला

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30

सोलापूर : दक्षिण तालुका पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे खून खटला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांच्या न्यायालयात शुक्रवारी वर्ग झाला. पहिल्या दिवशी तीन आरोपी हजर झाले. आता 27 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

Gurunath Katare murder case: A class accused in the court of Otti: | गुरुनाथ कटारे खून खटला औटींच्या न्यायालयात वर्ग आरोपी झाले हजर : चौघांवर खटला

गुरुनाथ कटारे खून खटला औटींच्या न्यायालयात वर्ग आरोपी झाले हजर : चौघांवर खटला

लापूर : दक्षिण तालुका पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे खून खटला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांच्या न्यायालयात शुक्रवारी वर्ग झाला. पहिल्या दिवशी तीन आरोपी हजर झाले. आता 27 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
प्रमोद उर्फ किंगभाई प्रकाश स्वामी (रा. रामवाडी, सोलापूर), जगदीश उर्फ दीपक उर्फ दीपू प्रभाकर मठपती (रा. महालक्ष्मी सोसायटी, शेळगी, सोलापूर), जगदीश उर्फ पिंटू रत्नाकर कोन्हेरीकर (रा. मसरे गल्ली, सोलापूर) आणि मास्टरमाईंड रमेश सिद्रामप्पा पाटील अशी आरोपींची नावे असून, या चौघांवर हा खटला चालणार आहे. आरोपींच्या वतीने अँड. संतोष न्हावकर हे काम पाहत आहेत. 13 ऑक्टोबर 2014 मध्ये रमेश पाटील याच्या सांगण्यावरून पहिल्या तीन आरोपींनी गुरुनाथ कटारे यांचा खून केला होता, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. या खटल्याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gurunath Katare murder case: A class accused in the court of Otti: