शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी ड्रायव्हरला अडकवल्याचं सीबीआय तपासात उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 08:05 IST

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी बस कंडक्टर अशोक कुमारजवळ हत्यार सापडल्याचा दावा करत आरोपी बनवण्याचा प्रयत्न केल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी बस कंडक्टर अशोक कुमारजवळ हत्यार सापडल्याचा दावा करत आरोपी बनवण्याचा प्रयत्न केल्याचं सीबीआय तपासात उघडलिसांनी बस कंडक्टर अशोकने शाळेत चाकू आणल्याचा केलेल्या दाव्याला काही आधार नाहीअशोक कुमारच्या कुटुंबाने हत्येचा खोटा आरोप लावत अटकेची कारवाई करणा-या पोलीस अधिका-यांविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे

नवी दिल्ली - गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी बस कंडक्टर अशोक कुमारजवळ हत्यार सापडल्याचा दावा करत आरोपी बनवण्याचा प्रयत्न केल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या सीबीआय तपासानंतर शाळेतीलच 16 वर्षीय विद्यार्थ्याने एका दुकानातून चाकू खरेदी करत प्रद्युम्नची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. 

तपासाशी संबंधित एका सीबीआय अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'हा चाकू अल्पवयीन आरोपीने एका स्थानिक दुकानातून खरेदी केला होता. हाच चाकू विद्यार्थ्याने शाळेच्या आत नेला होता. पोलिसांना सापडलेला हा एकमेक चाकू आहे. त्यामुळे पोलिसांनी बस कंडक्टर अशोकने शाळेत चाकू आणल्याचा केलेल्या दाव्याला काही आधार नाही'.

गुरुवारी आरोपीने ज्या दुकानातून चाकू खरेदी केला होता त्याबद्दलही माहिती दिली आहे असं सीबीआय अधिका-याने सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, 'अल्पवयीन आरोपीने आपले वडिल, एक स्वतंत्र साक्षीदार आणि सीबीआय अधिका-यासमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. आपण काही सेकंदात प्रद्युम्नचा गळा कापला आणि शौचालयाबाहेर आलो अशी कबुली आरोपीने दिली आहे'.

सीबीआयकडून 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर बस कंडक्टर अशोक कुमारच्या कुटुंबाने हत्येचा खोटा आरोप लावत अटकेची कारवाई करणा-या पोलीस अधिका-यांविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशोक कुमारचे वडील अमीरचंद यांनी सांगितलं आहे की, 'माझ्या मुलाला फसवण्यात आलं होतं हे जवळपास स्पष्ट झालं आहे. आम्ही गुरुग्राम पोलिसांच्या विशेष तपास पथकाविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस अधिका-यांनी त्याला अडकवलं, आणि प्रसारमाध्यमांसमोर गुन्हा कबूल करावा यासाठी धमकावलं, तसंच अंमली पदार्थांचा डोसही दिला'. पोलीस अधिका-यांविरोधात केस दाखल करण्यासाठी आपण ग्रामस्थांकडे आर्थिक मदत मागितली असल्याचं अमीरचंद यांनी सांगितलं आहे. 

काय आहे प्रकरण?8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.  याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असं अशोक कुमारने सांगितलं होतं. 

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलCrimeगुन्हाPoliceपोलिसMurderखून