शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेसनं जाहीर केली 76 उमेदवारांची यादी, नाराज कार्यकर्त्यांनी केली पक्ष कार्यालयात तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 13:05 IST

काँग्रेसनं गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (27 नोव्हेंबर) 76 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे

अहमदाबाद - काँग्रेसनं गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (27 नोव्हेंबर) आपल्याा 76 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये गोवाभाई एच राबारी, डॉक्टर किरीट पटेल, रमेश भाई चावडा, जीवाभाई पटेल, गोविंद ठाकोर, सुरेशभाई सी पटेल, बलदेव जी सी ठाकोर, प्रकाश डी. तिवारी, श्वेता ब्रह्मभट्ट आणि राजेंद्र पटेल यांचा समावेश आहे. दरम्यान,  राज्यात दुस-या टप्प्यात होणा-या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची 28 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. 

दरम्यान, काँग्रेसनं उमेदवारांची ही यादी जाहीर केल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तिकीट वाटपावरुन प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांनी गांधीनगर येथील पक्षाच्या कार्यालयात तोडफोड करत आपला राग व्यक्त केला. 

कधी आहे मतदान?

9 डिंसेबर आणि 14 डिसेंबरला गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकांसाठी काँग्रेसनं चांगलीच कंबर कसलीय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील गुजरातमध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे.  

मागील दोन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता टिकवून ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. भाजपाला प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधून येतात. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाने गुजरातची लढाई प्रतिष्ठेची केली आहे. मोदींच्या काळात भाजपाने इथे आपली पाळंमुळं अधिक  घट्टपणे रोवली. पण मोदी दिल्लीत गेल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय उलथापालथी घडल्या. 

आनंदीबेन पटेल यांना तिकीट नाहीदरम्यान,  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन सुरू असलेल्या प्रचंड गोंधळामध्येच भाजपानंही आपली सहावी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 34 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच भाजपानं गुजरात विधानसभेसाठीच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान, या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या नावाचा समावेश नाहीय, त्यांच्याऐवजी भूपेंद्र पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे. कारण, आनंदीबेन पटेल यांनी निवडणूक लढवण्यास पूर्वीच नकार दिला होता.  भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरीचे सुरू झालेले प्रकरण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत सुरू आहे.   

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी