शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी विधेयक लोकसभेत सादर

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

राज्यांचे नुकसान नाही तर फायदाच होईल : जेटली यांची ग्वाही

राज्यांचे नुकसान नाही तर फायदाच होईल : जेटली यांची ग्वाही
नवी दिल्ली : करप्रणालीची फेररचना आणि विविध करांचा बोजा कमी करणारे वस्तू आणि सेवाकराशी संबंधित असलेले बहुप्रतीक्षित जीएसटी विधेयक शुक्रवारी लोकसभेत मांडण्यात आले. घटना (१२२ वी दुरुस्ती) विधेयक २०१४ सभागृहात सादर करताना, विधेयकाच्या मसुद्यात राज्यांच्या चिंतांची काळजी घेण्यात आली आहे आणि त्यांचे हित जोपासण्यात आले आहे, अशी ग्वाही वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
गेल्या आठवड्यात अनेक राज्यांचे मंत्री आणि प्रतिनिधी यांच्यासोबत आपल्या अनेक बैठका झाल्या. या बैठकीत जीएसटीशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकाचा मसुदा दाखविण्यात आला. राज्यांच्या सूचनांवरून या मसुद्यात काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत, असे जेटली यांनी सांगितले.
अशीच एक बैठक गेल्या सोमवारी घेण्यात आली. जीएसटी केंद्र आणि राज्ये अशा दोघांच्याही फायद्याचे आहे. जीएसटी लागू झाल्यामुळे राज्यांचे करापोटी जे नुकसान होईल, त्याची भरपाई करण्यासाठी संवैधानिक हमीची तरतूद केली असेल आणि नुकसानभरपाईचा पहिला हप्ता पुढच्या वर्षी ३१ मार्चपूर्वी देण्यात येईल. त्याचे व्यावहारिक स्तरावर अनेक फायदे होतील, असे नमूद करून अरुण जेटली पुढे म्हणाले, हे जीएसटी विधेयक संपुआ सरकारने २००६ मध्ये लोकसभेत मांडले होते. परंतु ही संकल्पना मूलत: वाजपेयी सरकारच्या काळातील आहे. पश्चिम बंगालने या विधेयकाला पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट आहे.
जीएसटीला गती देण्यासाठी केंद्रीय विक्रीकराअंतर्गत (सीएसटी) राज्यांना थकबाकीची भरपाई करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. कोणत्याही राज्याला एका पैशाचेही नुकसान होणार नाही, याची आम्ही काळजी घेतलेली आहे, असे जेटली यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी या जीएसटी विधेयकाला मंजुरी दिली होती.
सरकारने हे विधेयक लोकसभेत मांडले आहे. परंतु त्यावर चर्चा आणि ते पारित करण्यासाठी हे विधेयक संसदेच्या फेबु्रवारीमध्ये होणाऱ्या अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. हे विधेयक पुन्हा स्थायी समितीकडे पाठविण्याची गरज पडणार नाही, अशी आशा आहे, असेही जेटली म्हणाले.
या विधेयकात पेट्रोलजन्य पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. परंतु त्यावरील जीएसटीचा दर शून्य राहील. याचा अर्थ राज्य सरकारे पुढच्या काही वर्षांपर्यंत पेट्रोलजन्य पदार्थांवर मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि केंद्रीय अबकारी शुल्क लागू करू शकतील. त्यानंतर या पेट्रोलजन्य पदार्थांवर पूर्णत: जीएसटी लागू केला जाईल. हा कर केव्हा लागू करायचा हे जीएसटी परिषद निश्चित करेल. या प्रस्तावित जीएसटी परिषदेत दोन तृतीयांश सदस्य हे राज्यांचे असतील. अल्कोहोलच्या (मद्य) संदर्भात राज्य सरकारांना सध्याच्या व्यवस्थेनुसारच कर आकारता येईल. पेट्रोलजन्य पदार्थांवरील करावरून प्रस्तावित जीएसटी विधेयक किमान सात वर्षांपासून अडकलेले होते, हे येथे उल्लेखनीय आहे.
एवढे महत्त्वाचे विधेयक सरकारने अतिशय घाईगडबडीत मांडले आहे. हे विधेयक आधी स्थायी समितीकडे पाठवायला हवे होते, असे काही सदस्य म्हणाले. परंतु विधेयक घाईगडबडीत मांडण्यात आल्याचा आरोप जेटली यांनी फेटाळला.
वस्तू आणि सेवा कर केंद्र व राज्य सरकारद्वारा अधिग्रहित केल्या जाणाऱ्या अनेक अप्रत्यक्ष करांचे स्थान घेईल. जीएसटी केंद्रीय स्तरावर अबकारी शुल्क आणि सेवा कर व राज्यांमध्ये लागू असलेला व्हॅट आणि स्थानिक कराची जागा घेईल, असे या विधेयकात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)