शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

कोरोना रुग्णवाढीचा आलेख अनेक राज्यांत उतरणीला, देशात दुसरी लाट होतेय कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 6:06 AM

सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो उत्तराखंडमधून. तेथे शनिवारी ८३९० रुग्ण होते. ते रविवारी ५८९० नोंदले गेले. या छोट्या राज्यात २५०० रुग्ण कमी झाले. कुंभमेळ्यात उत्तराखंडमध्ये दहशत वाटावी, असे रुग्ण वाढत होते.

हरीश गुप्ता -नवी दिल्ली : मोठी जीवितहानी घडवलेल्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर अनेक राज्यांत उतार लागल्याचे दिसत आहे. ही लाट अनेक राज्यांत एक तर सपाट होताना किंवा तिचा आलेख खाली येताना दिसतो आहे. उत्तर प्रदेश, बिहार या फार मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांत गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्ण कमी होताना दिसत आहे आणि रविवारी त्या संख्येत लक्षणीय घट झाली. पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या सपाट होऊ लागली आहे.

सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो उत्तराखंडमधून. तेथे शनिवारी ८३९० रुग्ण होते. ते रविवारी ५८९० नोंदले गेले. या छोट्या राज्यात २५०० रुग्ण कमी झाले. कुंभमेळ्यात उत्तराखंडमध्ये दहशत वाटावी, असे रुग्ण वाढत होते. राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये रुग्ण संख्येत रविवारी घसरण दिसली. या सगळ्याच राज्यांतून आणि केंद्रशासित प्रदेशांतील अंतिम आकडेवारी मध्यरात्रीनंतर मिळेल. या राज्यांत गेल्या आठवड्यात रुग्णसंंख्येत मोठी वाढ झाली होती त्यांना आता काहीसा दिलासा मिळू शकेल. लॉकडाऊन आणि प्रचंड प्रमाणावरील निर्बंधांमुळे रुग्णसंख्या वाढीची साखळी तुटण्याच्या मार्गावर आहे. रुग्णसंख्येत सर्वात लक्षणीय घट झाली ती केरळमध्ये. तेथे शनिवारी ४१ हजार ९७१ रुग्ण होते. ते दुसऱ्या दिवशी ३५८०१ नोंदले गेले.

- बिहार आणि गुजरातमध्येही गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या कमी होताना दिसते आहे आणि मध्यप्रदेशमध्ये ही संख्या रविवारी ५५० ने कमी होऊन ११,०५१ वर आली. कर्नाटकमध्ये रविवारीही रुग्णवाढ कायम होती. तेथे महाराष्ट्रातील ४८४०१ रुग्णसंख्येच्या तुलनेत ४७९३० रुग्ण होते. रुग्णवाढीत कर्नाटक महाराष्ट्रालाही मागे टाकेल, असे दिसते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस