शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रामदेव बाबा म्हणतात, सरकारनं जेएनयूतल्या वयस्कर विद्यार्थ्यांना पेन्शन द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 18:50 IST

जेएनयूमधल्या आंदोलनांवर रामदेव बाबांची खोचक टोला

नवी दिल्ली: योगगुरू रामदेव बाबांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर खोचक शब्दांत भाष्य केलं आहे. विद्यापीठात शिकणाऱ्या वयस्कर विद्यार्थ्यांना सरकारनं पेन्शन द्यावी. त्यामुळे ते विद्यापीठ परिसरात शांत राहतील, अशा शब्दांत रामदेव बाबांनी जेएनयूतल्या आंदोलनांवर उपरोधिक टीका केली. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये बोलताना त्यांनी जेएनयूतल्या घडामोडींवर मार्मिक भाष्य केलं. आंदोलनं करण्याचं काम राजकीय पक्षांना करू द्या. तुम्ही वर्गात जाऊन अभ्यास करा, असा सल्ला रामदेव बाबांनी विद्यार्थ्यांना दिला. जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी शुल्क वाढीविरोधात केलेल्या आंदोलनाची देशभरात चर्चा झाली होती. त्यावर आज रामदेव बाबांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं. सीएएच्या विरोधात आंदोलनं करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'काही राजकीय पक्ष, आंतरराष्ट्रीय शक्ती आणि काही जातीयवादी संघटना सीएएचा विषय तापवून अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी काहींकडून देशातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीएएच्या माध्यमातून कोणाचंही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही,' असं रामदेव बाबा म्हणाले. आंदोलकांनी हिंसाचार करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. कोणताही नेता किंवा राजकीय पक्ष कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये. लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करुन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये. कोणत्याही कट्टरतावादी संघटनेच्या अपप्रचाराला लोकांनी भुलू नये, असंदेखील ते म्हणाले.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा