शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अ˜ल चोरट्याकडून सव्वा किलो सोने जप्त

By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST

१७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३८ गुन्हे उघडकीस

१७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३८ गुन्हे उघडकीस
अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार यांची माहिती
(फोटो)
इचलकरंजी : पेन्शन बँकेत जमा झाली आहे, ती मिळवून देतो, अशी बतावणी करून वयोवृद्धांना फसवून त्यांची लुबाडणूक करून जिल्‘ात धुमाकूळ घालणार्‍या दस्तगीर गुलाब शेख (वय ३६, रा. सदर बाजार, कोल्हापूर) यास शिवाजीनगर पोलिसांनी आज (शनिवार) अटक केली.
कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्‘ातील एकूण ३८ गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी या गुन्‘ातील ३० लाख रुपये किमतीचे सुमारे सव्वा किलो सोने जप्त केले आहे. फसवणुकीचे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची जिल्‘ातील ही पहिलीच घटना आहे. शिवाजीनगरचे पोलीस कॉन्स्टेबल सुरेश सावंत व मन्सूरअली जमादार या दोघांच्या अथक प्रयत्नांनंतर शेख याला गजाआड करण्यात यश आले.
याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील रामगोंडा पाटील व त्यांची पत्नी हे दोघेजण कर्‍हाड येथील नातेवाइकांकडे जाण्यासाठी ३ मे रोजी इचलकरंजीत आले होते. बसस्थानकात त्यांना गाठून दस्तगीर शेख याने पेन्शनच्या बहाण्याने रामगोंडा पाटील यांना मोटारसायकलवर बसवून स्टेशन रोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ नेऊन सोडले व पुन्हा बसस्थानकात येऊन रामगोंडा पाटील यांच्या पत्नीस बॅँकेत सही लागणार आहे, दागिने काढून ठेवा, अशी बतावणी करून त्यांच्याकडील दागिने लांबविले. या घटनेनंतर पोलीस कॉन्स्टेबल सावंत व जमादार हे दोघेही शेख याच्या पाळतीवर होते. घटना घडल्यानंतर दोन दिवस बनावट दागिने परिधान करून वृद्धांच्या मदतीने संबंधित चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही.
त्यानंतर रामगोंडा पाटील यांना सोबत घेऊन फसवणूक करणार्‍याचा शोध घेण्यात येत होता. अखेरीस मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर एस.टी.तून उतरताना शेखला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपण केलेल्या गुन्‘ांचा पाढा वाचला. कोल्हापुरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, इचलकरंजी, कुरुंदवाड, वडगाव, शिरोळ, मुरगूड, गांधीनगर, हुपरी, भुदरगड, कोडोली, कागल, करवीर, आजरा, जयसिंगपूर, गडहिंग्लज, आदी विविध ठिकाणी ३८ हून अधिक फसवणुकीचे प्रकार केल्याचे त्याने सांगितले.
फसवणुकीतून लंपास केलेले सुमारे ३० लाख रुपये किमतीचे एक किलो १२० ग्रॅम सोन्याचे दागिने त्याच्या घरातून पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. शेख याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्याच्याकडून या गुन्‘ात वापरलेली मोटारसायकलही जप्त केल्याचे मकानदार यांनी सांगितले. शेख हा फळविक्रीचा व्यवसाय करीत होता. कोल्हापुरातून येऊन वृद्धांना गाठून त्यांना लुबाडण्याचा हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. शेखने सोने वितळवून त्याच्या लड्या बनविल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात एखाद्या सराफाचा सहभाग आहे. शेख याच्याकडून पेन्शनच्या बतावणीखाली फसवणूक झालेल्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)
(फोटो ओळी)
दस्तगीर शेख याच्याकडून शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केलेले दागिने.