शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 15:43 IST

lucknow girl found dead : एक तरुणी घरातून फोनवर बोलत बाहेर निघाली, ती परत आलीच नाही.

लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एक तरुणी घरातून फोनवर बोलत बाहेर निघाली, ती परत आलीच नाही. त्यानंतर काही तासांनी तिचा मृतदेह जंगलात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती दुपारी घरातून निघाली, तेव्हा तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला होता. त्याच्यासोबत बोलत बोलत ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती लगेच घरी परतली नाही. काही तासांनी तिचा शोध घेतल्यानंतर  गावातील लोकांना जंगलात तिचा मृतदेह दिसला. यानंतर या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

ही घटना लखनऊच्या आशियाना पोलीस ठाणे परिसरातील आहे. मुळचे हरदोईचे असलेले शमशाद हे बिजनौर येथे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची २२ वर्षीय मुलगी गुलशन हिचा काहीच दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. तर, चार महिन्यांनी तिचे लग्न होणार होते. त्यामुळे कुटुंब तिच्या लग्नाची तयारी करत होते.

शमशाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन नवीन नात्यामुळे खूप खुश होती. ज्याच्यासोबत तिचे लग्न होणार होते, तो ड्रायव्हर आहे. दोघांमध्ये चांगले नातं जमलं होतं. ते दोघे दिवसभर फोनवर बोलत राहायचे. गुरुवारी दुपारीही ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलत-बोलत घरातून बाहेर पडली होती. पण, आम्हाला कळालं की, तिने आत्महत्या केली आहे. आम्हाला कोणावरही कुठला संशय नाही. पण, मुलीने इतका टोकाचा निर्णय का घेतला? हे सुद्धा समजले नाही.

काय म्हणाले पोलीस?पोलिसांनी सांगितले की, जंगलात एका तरुणीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आमची टीम घटनास्थळी पोहोचली, तेव्हा आम्हाला आढळले की, तरुणीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेला होता. तिच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पण, तिचा फोन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, तरुणीच्या कुटुंबीयांची आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचीही चौकशी केली जाणार आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे समजते. मात्र तरीही या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी