शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणा-या तांत्रिकाचे मुलीने गुप्तांग कापले

By admin | Updated: August 1, 2014 11:56 IST

बिहारमधील मधेपूरा येथे एका मुलीवर बलात्कार करणा-या तांत्रिकाला पिडीत मुलीने शिक्षा दिली आहे. पिडीत मुलीने त्या तांत्रिकाचे गुप्तांग कापले आहे.

 

मधेपूरा (बिहार), दि. १ - बिहारमधील मधेपूरा येथे एका मुलीवर बलात्कार करणा-या तांत्रिकाला पिडीत मुलीने शिक्षा दिली आहे. पिडीत मुलीने त्या तांत्रिकाचे गुप्तांग कापले असून तांत्रिकाची पोलखोल करण्यासाठी तिने तांत्रिकाचा फोन कॉलही रेकॉर्ड करुन पोलिसांकडे सोपवला आहे. 
मधूपरा येथे राहणारी पिडीत मुलगी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या  तांत्रिक नातेवाईकाला उपचार करण्यासाठी बोलवून घेतले. मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगत तांत्रिक महेंद्र मेहताने तिला एका खोलीत नेले. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच याची वाच्यता कुठे करु नको असेही धमकावले. मेहता नातेवाईक असल्याने आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही असे त्या मुलीला वाटत होते. अखेरीस या घटनेचा बदला घेण्याचा तिने निर्णय घेतला. 
काही दिवसांनी पिडीत मुलगी घरी एकटी असताना मेहताने तिला स्वतःच्या घरी बोलवून घेतले. पिडीत मुलीने धैर्य दाखवत रात्री मेहताच्या घरी गेली. घरी गेल्यावर तिने मेहताचे बोलणे फोनवर रेकॉर्ड करुन घेतले. यानंतर चाकूने मेहताचा गुप्तांग कापून ती घटनास्थळावरुन पसार झाली. 
मेहता हा पिडीत मुलीच्या मावशीचा पती असल्याने मुलीच्या कुटुंबाने प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्नही केला. गावातील पंचायतीनेही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र काही स्थानिक राजकीय नेत्यांनी या घटनेचा विरोध दर्शवत पिडीत मुलीला तक्रार नोंदवण्यासाठी मदत केली. पिडीत मुलीने पोलिसांकडे मेहताविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. पुरावा म्हणून तिने मेहताचे फोनवर रेकॉर्ड केलेले संभाषणही पोलिसांकडे दिले आहे. पिडीत मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मेहता गावातून पसार झाला आहे. त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.