शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

राज्यसभेतून गुलाम नबी 'आझाद'; आठवलेंनी वाचली कविता, मोदी- शाहंनाही हसू आवरलं नाही

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 09, 2021 1:31 PM

आपल्याला पुन्हा येथे आणण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर, आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. येथे येण्यास कसल्याही प्रकारचा त्रास नाही, मीही तिकडेच होतो. मात्र, आता इकडे आलो आहे.

नवी दिल्ली -काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना आज राज्यसभेतून निरोप देण्यात आला. संसदेत निरोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी त्यांची जबरदस्त तारीफ केली. यावेळी ते भाऊकही झाले. यानंतर बोलण्याची वेळ आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची. त्यांनी गुलाम नबींसाठी एक कविताच वाचली. कविता वाचल्यानतंर रामदास आठवले म्हणाले, काँग्रेसने तुम्हाला पुन्हा येथे आणले नाही, तर आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. यानंतर सभागृहात एकच हाशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ((Narendra Modi)) आणि गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनादेखील हसू आवरता आले नाही. (Ghulam Nabi Azad farewell)

मीही तिकडेच होतो, पण आता इकडे आलोय -गुलाम नबी यांची तारीफ करताना रामदास आठवले म्हणाले, ‘’आपला स्वभाव अत्यंत चांगला आहे. आपण फार मोठ्या मणाचे आहात. आपण पुन्हा या सभागृहात यायला हवे. जर आपल्याला पुन्हा येथे आणण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर, आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. येथे येण्यास कसल्याही प्रकारचा त्रास नाही, मीही तिकडेच होतो. मात्र, आता इकडे आलो आहे. तर तुम्हाला काय त्रास आहे. आपण पुन्हा सभागृहात यायला हवे. हीच आमची इच्छा आहे.

राज्यसभेत पंतप्रधान मोदी भावूक, इंटरनेट युझर्सच्या आल्या अशा प्रतिक्रिया

रामदास आठवलेंची कविता -राज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबीराज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबी...हम मिलते रहेंगे आपको कभी कभीआपका नाम है गुलाम, इसलिए मैं करता हूं आपको सलामआपका नाम है गुलाम, लेकिन आप हमेशा रहे आजादआप हम सभी को रहेंगे याद15 अगस्त को देश हुआ आजाद, लेकिन राज्यसभा से आप आज हो रहे आजादआप हमेशा रहो आजाद, हम रहेंगे आपके साथ... ये अंदर की है बातमोदी जी जम्मू कश्मीर का मजबूत करेंगे हाथ और आपका देते रहेंगे साथ...

कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद

पंतप्रधान मोदींनी केली गुलाम नबींची तारीफ, भावूकही झाले -तत्पूर्वी, जम्मू काश्मिरातील एका दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले, ''ते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आमची चांगली जवळीक होती. एकदा गुजरातचे नागरिक जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केले. या हल्ल्यात आठ लोक मारले गेले होते. सर्वप्रथम गुलाम नबी यांचा मला फोन आला.'' एवढे बोलताच पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी सभागृहात एकच शांतता पसरली होती. यानंतर मोदींनी पाणी पिले आणि स्वतःला सावरले. यावेली त्यांनी सभागृहाची क्षमाही मागितली.

1982 साल 'ते' कधीच विसरणार नाहीत, पवारांच्या विधानावर सभागृहात हशा

काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह 4 खासदारांचा आज संसदेतला शेवटचा दिवस आहे, त्यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले, त्याचसोबत आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचं दिसून आलं. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा