1982 साल 'ते' कधीच विसरणार नाहीत, पवारांच्या विधानावर सभागृहात हशा

By महेश गलांडे | Published: February 9, 2021 01:32 PM2021-02-09T13:32:01+5:302021-02-09T13:50:49+5:30

सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावर संबोधित केल्यानंतर मंगळवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेला संबोधित केले, काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांचा आज संसदेतला शेवटचा दिवस आहे.

संसद सभागृहात या 4 खासदारांच्या निरोप संमारंभात अनेकांनी भाषण केलं. सर्वप्रथम निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले, त्याचसोबत आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचं दिसून आलं.

देशासाठी आझाद यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी सॅल्यूट करतो, सत्ता जीवनात येते आणि जाते, मात्र तिची ओळख ठेवावी हे गुलाम नबी आझादांकडून शिकायला हवे. मित्राच्या नात्याने मी आझाद यांचा खूप आदर करतो असंही मोदी म्हणाले.

राज्यसभेतून गुलाम नबी आझादांसोबत मीर मोहम्मद, शमशेर सिंह आणि नाजिर अहमद हे ४ सदस्य निवृत्त होत आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही गुलाब नबी आझाद यांच्या कारकिर्दीचा उल्लेख केला, तसेच मी आझाद यांना या सभागृहात सिनियर असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यासोबत काम करण्याचा योग मला मिळाला.

संघटनेतील नेता हीच घरी गुलाब नबी यांची ओळख आहे, त्यांच्या संघटन कौशल्यामुळेच त्यांना युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आझाद यांच्यासाठी 2 कारणांनी 1982 साल अतिशय महत्त्वाचं आहे. कारण, सर्वप्रथम त्यांनी 1982 मध्ये त्यांनी लग्न केलं. या वाक्यावर सभागृहात हशा पिकला.

महाराष्ट्रातील सर्वात मागासलेल्या वाशिम जिल्ह्यातून 1980 मध्ये त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी घेतली. त्यावेळी, ते वाशीममधून निवडूनही आले व 1982 साली मंत्रीपदी विराजमान झाले. तेथील लोकांचा विश्वास त्यांनी प्राप्त केला. त्यातून, जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिलं.

वाशीमचे नागरिक आजही त्यांची आठवण काढतात, त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभावेळी वाशीमचा उल्लेख आवर्जून निघतो, असेही पवार यांनी सभागृहात म्हटले.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही गुलाब नबी आझाद यांना नेहमीच्या कवितस्टाईलने निरोप दिला. यावेळी, आठवले यांची कविता ऐकून आझाद यांनाही हसू आवरले नाही.

आठवलेंच्या कवितेमुळे राज्यसभेतील वातावरण हास्यमय झाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदीनाही हसू आले

वाशीमचे नागरिक आजही त्यांची आठवण काढतात, त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभावेळी वाशीमचा उल्लेख आवर्जून निघतो, असेही पवार यांनी सभागृहात म्हटले.