शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गॅस चोरी प्रकरण- पेट्रोलियम मंत्रालय रिलायन्सच्या बाजूने

By admin | Updated: August 20, 2014 12:23 IST

गॅस चोरी प्रकरणी ओएनजीसीने रिलायन्सवर लावलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत पेट्रोलियम मंत्रालयाने ही याचिका रद्द करण्याची मागणी न्यायालयात केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २० - केजी बेसिनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज व सरकारी कंपनी ओएनजीसी यांच्यामधील गॅस चोरी प्रकरणाचा वाद आता निर्णायक अवस्थेत पोचला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने ओनएजीसीच्या विरोधात एक प्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेविट) सादर करत ओएनजीसीला फटकारले आहे. ओएनजीसी अचानक झोपेतून जागी होऊन असे बिनबुडाचे आरोप लावत असल्याचे सांगत कंपनीची याचिका रद्दबातल करावी अशी मागणी पेट्रोलियम मंत्रालयाने न्यायालयात केली आहे. 
 ओएनजीसीने १५ मे रोजी रिलायन्सवर ब्लॉकमधून गॅस चोरी केल्याचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुकेश अंबानी यांच्या 'रिलायन्स' इंडस्ट्रीजने 'केजी- डी 6 'या ब्लॉक शेजारीच असलेल्या 'ओएनजीसी' च्या ब्लॉकमधून करोडो रुपयांचा गॅस काढल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. 
ओएनजीसीने या प्रकरणी भारत सरकार व पेट्रोलियम मंत्रालयाचा एक भाग असलेल्या  'डायरेक्टोरेट जनरल ऑफ हायड्रोकार्बन्स'लाही प्रतिवादी बनवत त्यांनी आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी योग्य पावले न उचलल्याचा आरोप लावला. 
मंत्रालयातर्फे गेल्या आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल केले. 'ओएनजीसीला गोदावरी पीएमएल ब्लॉक (जी-४) मध्ये उत्खननाचे अधिकार २००८ साली देण्यात आले तर रिलायन्स इंडस्ट्रीन एप्रिल २००९ मध्ये केजी - डी6 क्षेत्रातून उत्पादन सुरू केले होते. मात्र ओएनजीसीने दोन्ही क्षेत्र एकमेकांशी जोडले गेल्याबाबच कधी काही सांगितले नाही' असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 
जुलै २०१३ मध्ये ओएनजीसीने अचानक ही बाब निदर्शनास आणून दिल्याचे मंत्रालयाने म्हटले असून सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी आपल्या अधिकारांबद्दल कधीही जागरूक नव्हती असेही यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अचानक जागी होऊन ही कंपनी सरकारवर असे आरोप लावू शकत नाही, असे सांगत मंत्रालयाने ही याचिका रद्द करण्याची मागणी केली आहे.