शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर छोटा राजनची अटक म्हणजे ‘नुरा कुस्ती’

By admin | Updated: October 28, 2015 02:32 IST

गँगस्टर छोटा राजनला बाली येथे अटक होणार हे सरकारच्या महत्त्वपूर्ण पदांवरील बडे अधिकारी आणि मंत्र्यांना आधीच माहीत होते. त्याबाबत संकेतही दिले गेल्याचे उघड झाले आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीगँगस्टर छोटा राजनला बाली येथे अटक होणार हे सरकारच्या महत्त्वपूर्ण पदांवरील बडे अधिकारी आणि मंत्र्यांना आधीच माहीत होते. त्याबाबत संकेतही दिले गेल्याचे उघड झाले आहे. सरकार व राजन यांच्यातील नुरा कुस्तीची ही निष्पत्ती असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. ३० सप्टेंबर रोजी प्रस्तुत प्रतिनिधीने एका ज्येष्ठ मंत्र्याची भेट घेतली असता त्यांनी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार एखाद्या मोठ्या बातमीला दुजोरा देऊ शकते असे म्हटले होते. खरेतर छोटा राजनला अटक त्याचवेळी होणार होती, मात्र त्याबाबत व्यूहरचना करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले डावपेच आणखी काही दिवसांसाठी लांबणीवर टाकले होते. छोटा राजनला अटक करण्यात आलेल्या यशाकडे लक्ष वेधत बिहारच्या निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्याची रालोआची इच्छा होती; मात्र औपचारिकरीत्या कोणताही अधिकारी किंवा मंत्री त्याबाबत दुजोरा द्यायला तयार नव्हता. सदर मंत्र्याने दिलेले संकेत पाहता त्यावर विश्वास न ठेवण्याचे कारणही दिसत नाही.कदाचित गुपितावरील पडदा उघडला जाणारही नाही; मात्र सध्या छोटा राजन गंभीर आजाराशी झुंजत आहे. त्याला भारतात उपचार करायचे आहेत. तो भारतात पोहोचताच त्याला उपचार सुविधा उपलब्ध करवून दिल्या जातील. राजन याने स्वत:हून अटक करवून घेतली की खरेच त्याला इंटरपोलने जाळ्यात अडकवले, हा सवालही या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.डोवाल यांच्या इंडोनेशिया भेटीशी संबंधछोटा राजन केवळ भारतीय तपास संस्थांच्या संपर्कातच नव्हता तर दाऊदला अटक करण्यासाठी माहिती पुरविण्याचे काम करीत होता, तथापि आजपर्यंत त्याला पुष्टी मिळू शकली नव्हती.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा इंडोनेशिया दौरा आणि त्यानंतर छोटा राजनने बाली येथे पोहोचणे अकस्मात घडले नाही. तो बाली येथे पोहोचणार असल्याचे सरकारला माहीत असेल तर तपास संस्था त्याच्या संपर्कात होत्या काय? हा मुद्दा एक रहस्य बनून समोर आला आहे.